२ हजार रुपयांच्या कॉम्प्युटरवरून NASA वर सायबर हल्ला ; ‘५०० MB’ डाटा चोरीला

लॉस एंजलिस : वृत्तसंस्था – अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था नासावर सायबर हल्ला झाला आहे. युएस ऑफिस द इंस्पेक्टर जनरलच्या अहवालातून ही बाब समोर आली आहे. नासाच्या जेट प्रपल्शन लॅबोरेटरीच्या सिस्टीममधून ५०० एमबी डाटा चोरीला गेला आहे. या सायबर हल्ल्यामध्ये २३ फाईल्सचा डाटा लीक झाला आहे. हा हल्ला कोणी केला हे अद्याप नासाला समजू शकले नाही.

नासावर सायबर हल्ला होण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी नासावर सायबर हल्ला झाला होता. मागील वर्षी नासावर सायबर हल्ला होता. यावेळी नासावर सायबर हल्ला करून महत्वाची गोपनीय माहिती चोरीला गेली आहे. हा हल्ला करण्यासाठी Raspberry Pi या कॉम्प्युटरचा वापर करण्यात आला होता. याची किमंत फक्त २५ डॉलर आहे. हा कॉम्प्युटर आपल्या क्रेडीट कार्डच्या आकाराचा असतो.

नासावर झालेल्या सायबर हल्ल्यामध्ये नासाच्या योजनांची महत्वाची माहिती चोरीला गेली आहे. यामध्ये क्युरिऑसिटी रोव्हर, मंगळ ग्रहावर चालणाऱ्या कारची माहिती हॅकर्सनी चोरी केली आहे. हॅकर्सनी JPL ची प्रणाली भेदण्यासाठी डीप स्पेस नेटवर्कमध्ये प्रवेश केला. संपर्क साधण्यासाठी अँटीनाची ही प्रणाली आहे.

आरोग्य विषयक वृत्त –

निरोगी हृदयासाठी योग्य व्यायाम आणि आहार महत्वाचा

पांढरे केस काळे करा, मध आणि लसूण आहे रामबाण औषध

रोग प्रतिकारशक्ती दुबळी का होते ? जाणून घ्या

अर्धशिशी म्हणजे काय ? जाणून घ्या, करा हे उपाय