मोठी बातमी : NASA नं घेतले ‘चांद्रयान – 2’ च्या लॅडिंग साईटचे फोटो, लवकरच मिळणार खुशखबर !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – चांद्रयान – 2 च्या विक्रम लँडरशी संपर्क साधण्याचा कालावधी जवळपास कमी होत चालला आहे. या दरम्यान महत्वपूर्ण घटना घडली आहे. नासाच्या मून ऑर्बिटरने चंद्राच्या त्या भागातील फोटो घेतले जेथून चांद्रयान – 2 चा इसरोशी संपर्क तुटला होता.

नासाच्या एका वैज्ञानिकांना एका रिपोर्टमध्ये सांगितले की, नासाने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर आपल्या लुनर रिकॉनसेंस ऑर्बिटर (LRO) च्या मदतीने 17 सप्टेंबरला काही फोटो घेतले. नासा अजूनही या फोटोचे विश्लेषण करत आहे. याच भागात चांद्रयान – 2 च्या विक्रम लँडरने सॉफ्ट लँडिंग करण्याचा प्रयत्न केला होता, परंतू विक्रम लँडरशी लँडिंगच्या 2 किलोमीटर आधीच इसरोचा संपर्क तुटला.

विक्रम लँडरशी संपर्क साधण्याची संभावना 21 सप्टेंबरपर्यंत आहे. त्यानंतर चंद्राच्या त्या भागात अंधार होईल. लूनर रिकॉनसेंस ऑर्बिटर (LRO) चे डिप्टी प्रोजेक्ट सायंटिस्ट जॉन केलर यांच्या नव्या विधाननंतर हे तर निश्चित झाले की ऑर्बिटरच्या कॅमेऱ्याने फोटो घेतले आहेत.

फोटो अंधूक असण्याची शक्यता
ते म्हणाले की, LRO च्या टीमने या फोटोची जुन्या फोटोंशी तुलना करेल आणि त्यांचे विश्लेषण करेल की  लँडर दिसत आहे की नाही. हे फोटो तेव्हा घेण्यात आले जेव्हा ऑर्बिटर चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरुन जाईल. त्यावेळी अंधार होण्यास सुरुवात झाली होती. त्यामुळे शक्यता आहे की फोटो अंधूक असतील.
भारतीय आवकाश संशोधन संस्थेने (इसरो) सांगितले की लँडर विक्रम आणि रोवर प्रज्ञानला चंद्राच्या पृष्ठभागावर पोहचल्यावर फक्त 14 दिवस काम करायचे होते. त्यांचे वय चंद्राच्या 1 दिवसाच्या बरोबरीने होते, जे पृथ्वीवरील 14 दिवसांच्या बरोबर आहे.

जेथे विक्रम लँडर पडला तेथे चंद्राच्या पृष्ठभागावर सध्या अंधार आहे. 21 सप्टेंबरनंतर तेथे सूर्याचा प्रकाश पडणार नाही. चंद्रवर थंड वातावरण असते, रात्री ते कमी होऊन 200 डिग्री सेल्सियस होते. विक्रम लँडरच्या पार्टचे डिझाइन त्या तापमानाला साजेसे असे नाहीत. याआधी विक्रमशी संपर्क झाला नाही तर या शक्यता कायमच्या संपतील. कारण चंद्रावर 21 सप्टेंबरनंतर अंधार पडणार आहे.

इसरोने 7 सप्टेंबरला रात्री 1.50 वाजेच्या आसपास विक्रम लँडरला चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरवण्याचा प्रयत्न केला होता, परंतू मोहिम योजनेनुसार न झाल्याने विक्रमशी इसरोचा संपर्क तुटला. इसरो लवकरच चंद्रवरुन घेतलेले फोटो समोर आणेल.