NASA नं बनवलं जगातील सर्वात शक्तिशाली रॉकेट ‘बूस्टर’, ‘पावर’ 45 हायड्रोइलेक्ट्रिक धरणांच्या उर्जे इतकी

वॉशिंग्टन : वृत्तसंस्था –   अमेरिकन अंतराळ एजन्सी नासाने सुमारे 60 वर्षानंतर जगातील सर्वात शक्तिशाली रॉकेट बूस्टर बनवले आहे. याची यशस्वी चाचणी सुद्धा करण्यात आली. हा बूस्टर इतकी उर्जा निर्माण करतो, जेवढी 45 हायड्रोइलेक्ट्रिक धरणे मिळून करतात. हे रॉकेट अमेरिकन रॉकेट सॅटर्न-5 पेक्षा सुद्धा जास्त शक्तिशाली आहे. याच रॉकेटने अर्टेमिस मिशनअंतर्गत अमेरिकन एस्ट्रोनॉट्स चंद्रावर जातील आणि परत येतील.

नासाच्या शास्त्रज्ञांनी उटाहच्या वाळवंटातील टेस्टिंग फॅसिलिटीमध्ये या रॉकेटच्या शक्तीची चाचणी घेतली. येथे नासा आणि नॉर्थरोप ग्रुमन कंपनीचे अभियंते उपस्थित होते, जे खुप दूरवरून हे दृश्य पहात होते. या रॉकेटला केवळ दोन मिनिटे चालवण्यात आले होते. इतक्यातच त्याच्या ताकदीचा अंदाज आला.

या रॉकेट बूस्टरचे नाव सॉलिड रॉकेट बूस्टर (एसएलएस) आहे. आतापर्यंत जगात बनवण्यात आलेल्या सर्व रॉकेट बूस्टरपैकी हे सर्वात मोठे आहे. हे 54 मीटर म्हणजे 177 फुट लांब आहे. याचा व्यास 4 मीटर म्हणजे सुमारे 13.12 फुट आहे. 1960 मध्ये वापरण्यात आलेल्या सॅटर्न-5 रॉकेटपेक्षा सुद्धा अनेक पटीने जास्त ताकदवान आहे. अपोलो मिशनसाठी सॅटर्न-5 रॉकेटचा वापर करण्यात आला होता.

अमेरिकन अंतराळ संशोधन संस्था नासाने आपल्या मून मिशनसाठी तीन कंपन्यांची निवड केली आहे. या कंपन्या चंद्रापर्यंत एस्ट्रॉनॉट्सला पोहचवणारे आणि परत आणणारे यान किंवा स्पेसक्राफ्ट बनवतील. नासा 2024 मध्ये चंद्राच्या पृष्ठभागावर एक महिला अणि पुरूषाला उतरवेल. चंद्रावर उतरण्यासाठी नासाने लँडिंग सिस्टम बनवण्यासाठी तीन अमेरिकन अंतराळ कंपन्या निवडल्या आहेत.

या कंपन्यांची नावे स्पेस एक्स, ब्लू ओरिजिन आणि डायनेटिक्स अशी आहेत. यापैकी स्पेस एक्सचे मालक अरबपती एलन मस्क आणि ब्लू ओरिजिनचे मालक जेफ बेजोस आहेत. तीनही कंपन्या नासासोबत मिळून आपआपल्या लँडिंग सिस्टमचे डिझाईन बनवतील आणि विकसित करतील.

याच लँडिंग सिस्टमद्वारे नासा आपल्या अस्ट्रोनॉट्सला चंद्राच्या पृष्ठभागावर उतरवेल. सुरूवातीला डिझाईनच्या कामासाठी नासा तिनही कंपन्यांना एक अरब डॉलर म्हणजे 7577 कोटी रुपये देईल. तिनही कंपन्यांना दहा महिन्यात आपले सुरूवातीचे डिझाईन पूर्ण करावे लागेल.

नासाचे अ‍ॅडमिनिस्ट्रेटर जिम ब्रिडेनस्टाइन यांनी म्हटले की, तिनही कंपन्यांसोबत करार झाला आहे, त्यानुसार आम्ही प्रथमच एखादी महिला आणि पुरूष यांना चंद्रावर पाठवत आहोत. कंपन्यांना त्यांच्या जाण्या-येण्याकडे पूर्ण लक्ष ठेवावे लागेल. असे यान बनवावे लागेल जे सहज चालेल आणि सुरक्षित असेल.

ब्लू ओरिजिन या डिलची प्राथमिक कँडिडेट आहे. तिच्या टिममध्ये लॉकहीड मार्टिन, नॉर्थोप ग्रुम्मेन आणि ड्रेपर आहे. त्यांचे लँडर तीन स्टेजचे असेल. यामध्ये बीई-7 क्रायोजेनिक इंजिन लावलेले असेल. लॉकहीड क्रू केबिन बनवेल. नॉर्थोप ग्रुम्मेन कार्गो आणि फ्यूल मॉड्यूल आणि ड्रेपर गायडन्स, नेव्हिगेशन, कंट्रोल, एव्हियोनिक्स आणि अन्य सॉफ्टवेयर सिस्टम बनवणार आहे.

डायनेटिक्सकडे एकुण 25 सब-कॉन्ट्रॅक्टर्स आहेत, जे या मिशनमध्ये त्यांच्या सोबत काम करतील. या टिममध्ये अनेक दिग्गज सुरक्षा कंपन्या सुद्धा आहेत. याच्या डिझाईनमध्ये मल्टीपल मॉड्यूलर प्रोपेलेंट व्हेकल असतील. क्रू केबिन जमीनीपासून जास्त वर नसतील. दोन मोठे सोलर पॅनल असतील. यातून यानात चढणे-उतरणे आणखी सोपे होईल.

एलन मस्कच्या स्पेस एक्सने अर्टेमिस मिशनसाठी स्टारशिप बनवले आहे. याद्वारे चंद्र, मंगळ आणि अन्य ग्रहापर्यंत जाता येऊ शकते. यामध्ये विश्वासार्ह रॅप्टर इंजिन लावलेले आहे. क्रू केबिन खुप मोठी आहे. दोन एयरलॉक्स आहे जेणेकरून मून वॉक सहजपणे करता येईल. हे अनेकवेळा उपयोगात आणता येण्यासारखे रॉकेट आहे. याचा फ्यूल टँकर चंद्राच्या चारीबाजूने फेर्‍या मारत राहील. जशी गरज असेल स्टारशिपमध्ये रिफ्यूलिंग होईल. त्यानंतर दोन्ही आपल्या ध्येयासाठी निघतील.