अंतराळात घडलेल्या पहिल्या गुन्हेगारी घटनेचा तपास करणार ‘NASA’

पोलीसनामा ऑनलाईन – नासा च्या (NASA ) ऑफिस ऑफ इंस्पेक्टर जनरल या कार्यालयाकडून या प्रकरणाची चौकशी केली जात आहे. त्यासाठी दोन्ही पक्षांशी संपर्क साधला जात आहे. तपासात जर हे आरोप खरे ठरले तर, अंतराळात घडलेला हा पाहिलाच गुन्हा असेल. अंतराळ हे पृथ्वीवर राहणाऱ्या अनके लोकांसाठी एक रहस्यमय ठिकाण असल्याचे मानले जाते. संबंध मानवजात अंतराळात समजून घेण्याचा जाणून घेण्याचा सतत प्रयत्न करत असते.

असं म्हटलं जातं कि , माणूस जेथे जातो तेथे तो आपल्या सोबतच्या चांगल्या वाईट गोष्टी सुद्धा घेऊन जातो. अशीच एक घटना नासा मध्ये घडली असल्याचे समोर येत आहे. ते म्हणजे , आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून त्याने आपल्या होणाऱ्या पत्नीच्या बँक खात्याचा अनधिकृतपणे वापर केल्याचा आरोप आहे. सध्या नासा या प्रकरणाचा शोध घेत आहे.

नेमकं काय आहे प्रकरण, जाणून घ्या

न्यूयॉर्क टाईम्सच्या एका वृत्तानुसार, अंतराळवीर एनी मॅकक्लेन हिने तिच्या घटस्फोटित पतीने ती आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात राहत असताना बँक खात्याचा अनधिकृतपणे वापर केल्याचा. समर वार्डनने मॅकक्लेनविरोधात घीय व्यापार आयोगात तक्रार दिली आहे. एका रिपोर्ट नुसार , मॅकक्लेनने बँक खाते अनधिकृतपणे वापरले असल्याचे काबुल केले आहे. पण त्याने त्या काळात कसलाही गैरवापर केला नसल्याचे सांगितले.

अंतराळवीर मॅकक्लेनने असे सांगितले कि, ती केवळ आपल्या परिवाराची आर्थिक स्थिती कशी आहे हे पाहत होती. मुलांची काळजी घेण्यासाठी किंवा वीजेची बिले भारण्यासाठी वार्डन कडे पुरेसे पैसे आहेत कि, नाही हे पाहत होती. व तिच्याकडून कोणतेही चुकीचे काम केले गेले नाही . असे तिने आपले वकील हार्डीन यांच्या माध्यमातून न्यूयॉर्क टाइम्सला सांगितले. सोबतच हार्डीन यांनी सांगितले कि, ती आपल्या परिवाराची मदत करत होती.

दोघांचे २०१४ मध्ये झाले होते लग्न

एन चे हवाई दलाच्या इंटेलिजेंस डिपार्टमेंटमधील अधिकारी असलेल्या समर वार्डनशी लग्न झाले होते. पण चार वर्षांनंतर त्या दोघांमध्ये सर्व काही ठीक चालत नव्हते. वर्ष २०१८ मध्ये, वार्डनने कोर्टात घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला होता. नासाच्या ऑफिस ऑफ इंस्पेक्टर जनरल या कार्यालयाकडून या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी केली जात आहे.

त्यासाठी दोन्ही पक्षांशी संपर्क साधला जात आहे. तपासात जर हे आरोप खरे ठरले तर, अंतराळात घडलेला हा पाहिलाच गुन्हा असे. विशेष गोष्ट म्हणजे, जेव्हा एखादी व्यक्ती अंतराळात गुन्हा करते तेव्हा त्याचा गुन्हा हा पृथ्वीवर लागू होतो. या परिस्थितीत एनी दोषी आढळण्यास तिला अमेरिकन फेडरल कायद्यानुसार शिक्षा होऊ शकते.

आरोग्यविषयक वृत्त –