भारतातला पहिला Nasal Spray लॉन्च ! कोरोनावर उपचार करणार Fabispray, जाणून घ्या नाकाने दिले जाणारे ‘हे’ औषध व्हायरस कसा करेल नष्ट

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Nasal Spray | ग्लेनमार्क फार्मास्युटिकल्स लिमिटेड (ग्लेनमार्क) ने देशातील प्रौढांसाठी कोरोना संसर्गावर उपचार करण्यासाठी नायट्रिक ऑक्साईड नावाचा नसल स्प्रे (Nasal Spray) सुरू केला आहे. ग्लेनमार्कने कॅनेडियन कंपनी ’SaNOtize’च्या सहकार्याने हे विकसित केले आहे. नायट्रिक ऑक्साईड भारतात Fabispray ब्रँड अंतर्गत लाँच केले आहे.

 

नसल स्प्रेसाठी औषध नियामकाकडून मॅन्युफॅक्चरिंग आणि मार्केटिंगसाठी कंपनीला मान्यताही मिळाली आहे.

 

असे कार्य करेल
कंपनीचा दावा आहे की हा नायट्रिक ऑक्साईड आधारित नसल स्प्रे नाकाच्या वरच्या पृष्ठभागावरील कोरोना विषाणू प्रभावीपणे नष्ट करण्याचे काम करतो. चाचणी दरम्यान असे दिसून आले की याने कोविड-19 चे उच्चाटन आणि औषधातील अँटी-मायक्रोबियल गुणधर्म सिद्ध केले आहेत.

 

जेव्हा हा स्प्रे नाकातील म्युकसवर फवारला जातो, तेव्हा तो शरीरात व्हायरसला वाढण्यास पसरण्यापासून रोखण्यासाठी शारीरीक आणि रासायनिक अडथळा निर्माण करतो, त्यामुळे व्हायरसला फुफ्फुसात पसरण्यापासून प्रतिबंध होतो. (Nasal Spray)

 

COVID-19 साठी एक प्रभावी आणि सुरक्षित अँटीव्हायरल उपचार म्हणून स्प्रेचे वर्णन करताना, ग्लेनमार्क फार्मास्युटिकल्स लिमिटेडचे चीफ कमर्शियल ऑफिसर रॉबर्ट क्रॉकर्ट म्हणाले, आम्हाला खात्री आहे की हे औषध रुग्णांना अत्यंत आवश्यक आणि वेळेवर उपचार पर्याय प्रदान करेल.

एक आघाडीची फार्मास्युटिकल कंपनी म्हणून, हे महत्त्वाचे आहे की आम्ही कोविड-19 महामारीविरुद्धच्या भारताच्या लढ्याचा अविभाज्य भाग आहोत.
नायट्रिक ऑक्साईड नसल स्प्रे (FabiSpray) साठी मंजूरी मिळाल्याबद्दल आणि SaNOtize च्या भागीदारीत ते लॉन्च केल्याबद्दल आम्हाला आनंद आहे.

 

डॉ. मोनिका, वरिष्ठ तझ आणि क्लिनिकल डेव्हलपमेंटचे प्रमुख, ग्लेनमार्क फार्मास्युटिकल्स लिमिटेड यांनी सांगितले की फेज 3 च्या ट्रायलमध्ये,
डबल ब्लाईंड, प्लेसीबो नियंत्रित चाचणीचे निकाल अतिशय उत्साहवर्धक आहेत.
रूग्णांवर केलेल्या चाचण्यांमध्ये खूप सकारात्मक परिणाम दिसून आले आहेत.

 

सध्याच्या स्थितीत नवीन व्हेरिएंटमध्ये उच्च संसर्ग क्षमता दिसून आली आहे,
यामध्ये NONS देशांना कोरोना विरुद्धच्या लढ्यात एक उपयुक्त पर्याय प्रदान करते.

 

Web Title :- Nasal Spray | glenmark launches nitric oxide nasal spray for treatment of covid 19 patients in partnership with sanotize

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Sanjay Raut | संजय राऊतांचा थेट इशारा, म्हणाले – ‘… तर तुम्हाला नागपुरलाही जाता येणार नाही’

 

7th Pay Commission | कर्मचार्‍यांना मिळाली खुशखबर ! DA मध्ये झाली 3% ची वाढ, सरकारने केली घोषणा

 

Ajit Pawar | अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी शनिवार, रविवारीही शाळा सुरु ठेवा; अजित पवारांचे शिक्षकांना आवाहन