बॉलिवूडची पहिली महिला सुपरस्टार ‘ही’ अभिनेत्री ; ‘ब्यूटी क्वीन’ अशी ओळख पडली

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – भारतीय चित्रपटातील पहिली महिला सुपरस्टार आणि ब्यूटी क्विन नसीम बानोचा जन्म ४ जुलै १९१६ ला झाला. नसीम बानो लोकप्रिय अभिनेत्री सायरा बानोची आई आणि प्रसिद्ध अभिनेता दिलीप कुमारची सासु होती. तिने आपल्या करिअरची सुरुवात चित्रपट ‘खून का खून’ मधून केली होती. आज त्यांचा वाढदिवस आहे.

नसीम बानोचा सांभाळ शाही पद्धतीने झाला होता. असे म्हणले जाते की, ती स्कूलमध्ये पालखीमधून जात होती. नसीम इतकी सुंदर होती की, तिला पडद्यामध्ये ठेवले जात होते. एकदा नसीम आपल्या शाळेच्या सुट्ट्यांमध्ये आपल्या आईसोबत चित्रपट ‘सिल्वर किंग’ ची शूटिंग पाहण्यासाठी गेली होती आणि त्यांनी शूटिंग पाहून ठरवले की ते ही अभिनेत्री बनणार. स्टूडिओमध्ये नसीमच्या सुंदरतेला पाहून चित्रपटामध्ये काम करण्याची संधी मिळाली होती तेव्हा त्यांच्या आईने नसीम लहान आहे. म्हणून ती संधी नाकारली होती.

याच दरम्यान चित्रपट निर्माता सोहराब मोदीने आपला चित्रपट ‘खून का खून’ मध्ये काम करण्यासाठी नसीम यांच्याकडे प्रस्ताव ठेवला. त्यावेळी देखील नसीमच्या आईने नकार दिला. पण नसीम यांनी आपला हट्ट तसाच ठेवला की, त्यांना अभिनेत्री बनायचे आहे. एवढेच नाही तर नसीम या आपल्या आईला समजवण्यासाठी उपाशी देखील राहिल्या. नसीम बानोने सोहराब मोदीसोबत अनेक चित्रपटांमध्ये काम केले. यामध्ये तलाक, मीठा जहर, बसंती असे अनेक चित्रपट केले. ‘पुकार’ चित्रपटामधील नूर जहांची भूमिका साकारल्यानंतर त्या प्रसिद्ध झाल्या.

नसीम बानो यांनी मिया अहसान उल हकसोबत लग्न केले. त्यांनी ताजमहल पिक्सर्स बॅनरपण सुरु केला होता. ज्यामुळे अनेक चित्रपटांची निर्मिती झाली. वाटणीनंतर दोघे पाकिस्तान निघून गेले. पण नसीम बानो आपल्या दोन मुलांना घेऊन भारतात परतल्या. सुत्रांनी दिलेल्या माहितीसूनार, सारया बानो आणि दिलीप कुमार यांच्या लग्नामध्ये नसीम यांचे मोठे योगदान आहे. १८ जून २००२ मध्ये ८५ वर्षामध्ये त्यांचे निधन झाले.

सिनेजगत

मुंबईतील पावसाचा बॉलिवूडवर देखील ‘इम्पॅक्ट’, ‘या’ चित्रपटासह इतरांना ‘फटका’

जायरा वसीमसारखे अजिबात नाहीत ‘या’ ‘टॉप’ ४ बालिवूड अभिनेत्रींचे ‘विचार’

Video : अभिनेत्री उर्वशी रौतेलासोबत ‘बोल्ड’ सीन करताना ‘हा’ अभिनेता ‘आऊट ऑफ कंट्रोल’ !

बहुजननामा

अनुसूचित जातीमध्ये १७ ओबीसी जाती समाविष्ट करण्याचा योगी सरकारचा निर्णय बेकायदा

आगामी विधानसभेसाठी वंचित-काँग्रेस एकत्र आल्यास समीकरणे बदलतील

शहरातील सर्व बांधकामे तातडीने थांबवा – बाबा आढाव