Naseeruddin Shah | CM योगी यांच्या ‘अब्बाजान’ वक्तव्यावर संतापले नसीरूद्दीन शाह; म्हणाले…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Naseeruddin Shah | उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (CM Yogi Adityanath) यांनी समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव (Akhilesh Yadav) यांच्यावर टीका करत असताना एक भाष्य केलं आहे. भाजपचं सरकार येण्यापूर्वी भेदभाव केला जात होता, आता सगळ्यांना समान न्याय मिळतो. 2017 च्या आधी जे अब्बाजान म्हणत होते, तेच रेशन संपवत होते, असं योगी म्हणाले. योगी यांच्या विधानावरुन ज्येष्ठ अभिनेते नसीरूद्दीन शाह (Naseeruddin Shah) यांनी नाराजी व्यक्त करत त्यांनी योगींवर टिकास्त्र सोडले आहे.

नसीरूद्दीन शाह (Naseeruddin Shah) म्हणाले की, योगी आदित्यनाथ यांनी केलेलं अब्बाजान वक्तव्य हे आक्षेपार्ह असून अपमानास्पद आहे. त्यावर प्रतिक्रिया देण्यासारखंही काही नाही,
असं नसीरूद्दीन शाह म्हणाले. पुढे शाह म्हणाले की, ही व्यक्ती (मुख्यमंत्री याेगी) जी आहे त्यावर प्रतिक्रिया काय देणार? अब्बा जान हे वक्तव्य द्वेषयुक्त वक्तव्यांचा भाग आहे,
अशा प्रकारची वक्तव्यं ते आधीपासून बोलत होते, अशी जोरदार टीका देखील शाह यांनी केलीय. एका मुलाखती दरम्यान बोलताना नसीरूद्दीन शाह यांनी आपली भुमिका मांडली आहे.

दरम्यान, ‘समाजवादी पार्टीचे सरकार गरीबांचे रेशन खाते व त्यांना मरू देते.
अब्बा जान म्हणणाऱ्या एका समुदायास फायदा पोहोचवत होते.
2017 च्या आधी गरीबांना रेशन का मिळत नव्हते?
कारण तेव्हा राज्य सरकार चालवणारे आणि माफिया गरीबांचे रेशन खात होते आणि लोक उपाशी मरत होते आणि त्यांचे रेशन नेपाळ आणि बांगलादेशपर्यंत पोहोचत होतं.
आज गरीबाचं रेशन कुणीच नाही घेऊ शकत, घेतलं तर तुरूंगात नक्कीच जाईल.
‘असं भाष्य मुख्यमंत्री योगींनी (CM Yogi Adityanath) केलं आहे.
समाजवादी पार्टी (सपा) पक्षावर त्यांनी निशाणा साधला आहे.

Web Titel :- Naseeruddin Shah | comments like abba jaan offensive naseeruddin shah reacts to yogi adityanaths remark

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune News | विकास हवाच आहे, मात्र आपल्या परंपरा मोडून नको, काँग्रेस नेत्याने पालिकेला दिला पर्याय

Vijay Wadettiwar | ‘…तर मी राजीनामा देतो’ – मंत्री विजय वडेट्टीवारांचं मोठं विधान

Pune Amenity Space | भाजप पदाधिकार्‍यांच्या चुकांवर पांघरूण घालण्यासाठी पाटलांचे ऍमेनिटी स्पेस विक्रीला समर्थन – राष्ट्रवादी