एफटीआयआयचे अध्यक्ष आहेत कुठे?; नसीरुद्दीन शहा यांचा सवाल

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

एफटीआयआयचे अध्यक्ष संस्थेत येतच नसतील तर त्यांच्या कामाचे मुल्यमापन करायचे कसे? शिवाय त्यांच्या कामावर मी भाष्य कसे करणार? अध्यक्ष आहेत कुठे ते येथे येतात तरी कधी? अशा प्रश्नांची सरबत्ती करत अभिनेते नसरूद्दीन शहा यांनी अभिनेते व एफटीआयआयचे अध्यक्ष अनुपम खेर यांच्यावर टीकेची झोड उठविली आहे.

अनुपम खेर यांची भारतीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्थेचेच्य अध्यक्षपदी नियुक्ती होऊन वर्ष पूर्ण झाले आहे. याबद्दल प्रतिक्रिया व्यक्त करताना नसरूद्दीन शहा म्हणाले, मी एफटीआयआयमध्ये लेक्चर देण्साठी अनेकदा येतो. अनुपम खेर हे एफटीआयआयमध्ये फारसे येत नाहीत असे मला समजले. मी स्वत:ही त्यांना येथे क्वचितच पाहिले आहे. अशा परिस्थितीत मी त्यांच्या कामकाजावर काय बोलणार. अनुपम यांनी संस्थेला पुरेसा वेळ दिला तरच आम्हाला त्यांचे काम पाहायला मिळेल आणि त्यानंतरच त्यांच्या कामाबद्दल मी काहीतरी बोलू शकेन, असा उपरोधिक टोलाही नसरुद्दीन यांनी हाणला. अनुमप खेर संस्थेत आलेले मी क्वचितच पाहिले आहे मग त्यांच्या कामकाजावर मी प्रतिक्रिया कशी देऊ? ते संस्थेत फक्त दोनवेळा आले आहेत, असे नसरुद्दीन म्हणाले.

तुकाराम मुंढे यांच्याविरोधातील अविश्वास ठराव घ्या : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस