#Birthday : नसीरुद्दीन शाह यांनी 20व्या वर्षी केला 36 वर्षीय महिलेशी दुसरा विवाह, वाचा काही ‘रंगीन’ किस्से

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूड स्टार नसीरुद्दीन शाह आज आपला 69 वा वाढदिवस साजरा करत आहेत. निशांत या सिनेमातून त्यांनी करिअरला सुरुवात केली होती. या सिनेमात त्यांचा छोटासाच रोल होता. परंतु त्यांच्या अॅक्टींगचे खूप कौतुक झाले. नसीरुद्दीन यांनी 100 हून अधिक सिनेमात काम केले आहे. आजही ते सिनेमात काम करतात. आज आपण सिनेमांसोबत त्यांच्या खासगी आयुष्यातील काही किस्से जाणून घेणार आहोत.

अक्टींग करिअर

नसीरुद्दीन शाह यांनी 1980 मध्ये हम पांच या सिनेमात काम केले होते. याशिवाय त्यांनी दिल आखिर दिल है, माणूस, कर्म, गुलामी, त्रिदेव, विश्वात्मा, मोहरा यांसारख्या अनेक सुपरहिट सिनेमात काम केले आहे.

15 वर्षांनी मोठ्या मुस्लिम मुलीशी लग्न

नसीरुद्दीन यांना वयाच्या 20 व्या वर्षी 36 वर्षीय मनारा सिकरी नावाच्या मुलीवर प्रेम झालं होतं. ज्यांना परवीन मुराद नावानेही ओळखलं जातं. मनारा शाह यांच्याहून 15 वर्षांनी मोठी होती. असे म्हटले जात आहे की, नसीर यांनी मनारा सोबत लग्न करण्याची इच्छा बोलून दाखवली तेव्हा त्याचे आईवडिल खूपच रागावले होते. वयाचं एवढं अंतर असूनही दोघांनी लग्न केलं. या दोघांना एक मुलगीही झाली जिचं नाव हिबा शाह ठेवण्यात आलं. याआधीही नसीर यांचं लग्न झालं होतं त्यांना एक मुलगाही होता. यानंतर नसीर यांनी मनारासोबत लग्न केलं होतं. एका वर्षातच त्यांना मुलगी झाली. हिबा एक वर्षाची असतानाच मनारा आणि नसीर यांच्यात खटके उडण्यास सुरुवात झाली. नंतर दोघे वेगळे झाले. यानंतर दोघांनी घटस्फोट घेतला. यानंतर मनारा आणि हिबा काही वर्षांनी इराणला शिफ्ट झाल्या.

अॅक्ट्रेस रत्ना पाठकसोबत लिव्हइन रिलेशनशिप

70 च्या दशकात नसीरुद्दीन शाह यांना अॅक्ट्रेस रत्ना पाठकवर प्रेम झालं. दोघे दीर्घकाळ लिव्हइनमध्ये राहिले. नसीर यांनी मनाराला घटस्फोट दिल्यानंतर 1982 मध्ये शाह आणि रत्ना पाठक यांनी लग्न केलं. या लग्नानंतर नसीर यांना रत्नापासून दोन मुले झाली. इमाद आणि विवान अशी त्यांची नावे आहेत. रत्नना पाठक सुप्रिया पाठक यांची सख्खी बहिण आहे.

आरोग्यविषयक वृत्त

‘या’ वेळा पाळा, पुन्हा कधीही होणार नाही अपचनाची तक्रार

पहिल्यांदा आई झाल्यानंतर नकळत होतात ‘या’ चुका, जाणून घ्या

‘या’ टेस्टमुळे समजेल तुम्ही डिप्रेशनमध्ये आहात की नाही ? जाणून घ्या

महिलांनी गरोदरपणात व्यायाम केल्याने होतील ‘हे’ खास फायदे

पावसाळ्यात फिट राहण्यासाठी ‘हा’ आहार घ्या, जाणून घ्या

दोरीवरील उडया मारण्याचे ‘हे’ आहेत फायदे, जाणून घ्या

डायबिटीज नियंत्रित करायचा आहे ? मग नक्की करा हे घरगुती उपाय

Loading...
You might also like