…म्हणून अभिनेते नसीरुद्दीन शहांच्या विरोधात कार्यक्रमस्थळीच निदर्शने

मुंबई : वृत्तसंस्था – अजमेर येथे लिटरेचर फेस्टिव्हलच्या आयोजकांनी कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमामध्ये नसीरुद्दीन शहा यांचा सहभाग होता मात्र हा कार्यक्रम रद्द करण्यात आला. कारण झुंडशाहीच्या मुद्द्यावर नसीर यांनी केलेल्या विधानावरून उजव्या गटांनी कार्यक्रमस्थळी निदर्शने केली. एका आंदोलकाने नसीर यांच्या पोस्टरवर शाई फेकली.
या कारणामुळे झाला विरोध 
‘काही दिवसापूर्वीअभिनेते नसीरुद्दीन शहा यांनी  एक व्हिडिओ व्हायरल केला होता त्यात त्यांनी सध्याच्या सामाजिक परिस्थितीवर भाष्य केल होतंं. सध्या समाजात चहूबाजूने विष पेरलं गेलं आहे. या परिस्थितीत लवकर सुधारणा होईल असं वाटत नाही. त्यामुळे मला माझ्या मुलांची चिंता सतावत आहे,’ अशी भीती प्रसिद्ध अभिनेते नसीरुद्दीन शहा यांनी व्यक्त केली. ‘उद्या माझ्या मुलांना जमावाने घेरलं आणि त्यांना तू हिंदू की मुसलमान असं विचारलं तर त्यांच्याकडे त्याचं उत्तर नसेल, त्यामुळे मला माझ्या मुलांची चिंता वाटतेय. कारण मी माझ्या मुलांना कधीच धार्मिक शिक्षण दिलं नाही. चांगलं आणि वाईटाचा धर्माशी काहीच संबंध नसतो,’ असं शहा यांनी म्हटलं आहे. या व्हिडिओत त्यांनी बुलंदशहर हिंसेचा उल्लेखही केला होता . एका पोलीस अधिकाऱ्यांच्या हत्येपेक्षा गायीच्या मृत्यूला अधिक महत्त्व दिलं जात असल्याचं सांगतानाच जे लोक कायदा हातात घेत आहेत, त्यांना शिक्षा ठोठावलीच पाहिजे, असं त्यांनी म्हटलं होते.
यानंतर त्यांच्यावर टीकेची झोड उठवण्यात आली. काही ठिकाणी त्यांच्याविरोधात आंदोलनही करण्यात आले. या पार्श्वभूमीवर आज अजमेर येथे दाखल झाल्यानंतरही नसीर आपल्या वक्तव्यावर ठाम राहिले. ‘मी ज्या देशावर प्रेम करतो, त्या देशाबद्दल वाटणारी चिंता मी बोलून दाखवली आहे. हा देश माझं घर आहे. त्यामुळे मी माझ्या घराबद्दल वाटणाऱ्या चिंतेपोटी काही मतप्रदर्शन केलं असेल तर तो गुन्हा कसा काय ठरू शकतो?’, असा सवाल त्यांनी केला.