अभिनेते नसीरूद्दीन शहांची मुलगी ‘हिबा’चा कर्मचाऱ्यांवर हल्ला, FIR दाखल

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – ज्येष्ठ अभिनेते नसीरूद्दीन शहा यांची मुलगी हिबा हिच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबईतल्या वर्सोवा येथे पशुवैद्यकीय क्लिनीकमधील कर्मचाऱ्यांवर हल्ला केल्याच्या आरोपाखाली हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना क्लिनीकमधील सीसीटीव्हीमध्ये कैद झाली होती. या घटनेचं फूटेजही वर्सोवा पोलिसांकडे सादर करण्यात आलं आहे.

नेमकं काय झालं ?
16 जानेवारी रोजी हिबानं दोन महिला कर्मचाऱ्यांना चापट मारली आणि ढकललं आहे असं सीसीटीव्ही मध्ये स्पष्ट दिसत आहे. फिलीन फाऊंडेशननं दाखल केलेल्या तक्रारीनुसार, हिबा तिच्या दोन मांजरीबरोबर त्यांचं निर्जंतुकीकरण करण्यासाठी आली होती.

तक्रारीत काय म्हटलं आहे ?
फिलीन फाऊंडेशननं आपल्या तक्रारीत असं म्हटलं आहे की, “दुसऱ्या मांजरीची सर्जरी सुरू असल्यानं हिबाला 5 मिनिटे थांबण्यासाठी सांगण्यात आलं होतं. परंतु हिबाला हे सहन झालं नाही. हिबाला राग अनावर झाला. तिनं धमकावत कर्मचाऱ्याला म्हटलं की, तुला माहिती नाही का की, मी कोण आहे?”

काय म्हणतंय फिलीन फाऊंडेशन ?
फाऊंडेशननं असा दावा केला आहे की हिबा कर्मचाऱ्यांना म्हणाली, “तुम्ही मला एवढा वेळ वाट पहायला कशी लावू शकता. एकतर मी रिक्षातून उतरल्यानंतरही कोणी मला मदत केली नाही.” फाऊंडेशननं असंही म्हटलं आहे की, मांजरींना आत घेण्यासाठी तिला काही औपचारिकता पूर्ण करण्यासाठी सांगण्यात आलं परंतु ती अचानक चिडली आणि वाईट साईट बोलू लागली. जेव्हा तिला क्लिनीक सोडण्यास सांगण्यात आलं तेव्हा तिनं स्टाफला चापट मारली. त्यांना ढकललं.”

पोलिसांनी आयपीसीमधील कलम 323, 504 आणि 506 नुसार गुन्हा दाखल केला आहे. सध्या पोलीस या प्रकणाचा पुढील तपास करत आहेत.

कोण आहे हिबा ?
हिबाबद्दल बोलायचं झालं तर हिबा एक अभिनेत्री असून नसीरूद्दीन शहां आणि त्यांची पहिली पत्नी परवीन मुराद यांची मुलगी आहे. हिबा सध्या नसीरूद्दीन आणि त्यांची पत्नी रत्ना पाठक शहा आणि मुलगा ईमाद आणि विवान यांच्यासोबत मुंबईत राहते.

Visit : Policenama.com

शिल्पा ने रविवार को लखनऊ में लिया मक्खन मलाई का आनंद
जब अचानक आमिर खान की बेटी इरा कूद-कूद कर नाचने लगी
दीपिका कक्कड़ ने एयरलाइन पर गैर-पेशेवर बर्ताव का आरोप लगाया
‘या’ ‘BOLD’ मराठमोळ्या अभिनेत्रीच्या साडीतील लुकची सोशलवर ‘चर्चा’ !
अभिनेत्री कॅटरीना कैफच्या ‘रेड’ साडीतल्या ‘देसी लुक’ची चाहत्यांना ‘भुरळ’ !
डायरेक्टरसोबत झोपयला नकार दिल्यानं ‘या’ अभिनेत्रीनं गमावले बिग बजेट प्रोजेक्ट !
मराठामोळी ‘लॅम्बोर्गिनी गर्ल’ हर्षदा विजयच्या ‘BOLD’ फोटोंचा सोशलवर ‘धुमाकूळ’ !
अभिनेत्री ‘कियारा आडवाणी’नं घातला चकणारा ‘हिरवा’ ड्रेस, चाहते म्हणाले- ‘तोतापरी’ !
अभिनेत्री उर्वशी रौतेलानं केलेला आतापर्यंतचा ‘SEXY’ डान्स सोशलवर ‘ट्रेंडिंग’ ! (व्हिडीओ)

‘ही’ ‘BOLD’ अभिनेत्री पिण्याच्या पाण्यासाठी 1 दिवसाला करते चक्क 4000 रुपयांचा ‘खर्च’ !
अभिनेत्री दिशा पाटनी रात्र अविस्मरणीय बनवण्यासाठी काय करते ? जाणून घ्या बेडरूम ‘सिक्रेट’ !

You might also like