नाशिकमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादीला धक्का, ‘हे’ 2 बडे नेते युतीच्या संपर्कात ?

नाशिक : पोलिसनामा ऑनलाईन – लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अनेक नेत्यांनी आणि आमदारांनी पक्षाला रामराम केलेला असताना आता पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसला फटका बसण्याची शक्यता आहे. मागील महिन्यात ५ विद्यमान आमदारांनी पक्षाला रामराम केल्यानंतर आता नाशिकमध्ये देखील पक्षाला मोठा फटका बसणार आहे. येथील माजी आमदार आणि एक विद्यमान आमदार पक्ष सोडणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.

इगतपुरी विधानसभा मतदारसंघाच्या विद्यमान काँग्रेस आमदार निर्मला गावित या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे आता राष्ट्रवादीपाठोपाठ काँग्रेसला देखील धक्का बसण्यास सुरुवात झाली आहे. त्याचबरोबर दिंडोरीतील माजी एक आमदार देखील भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती समोर येत आहे. कालच राष्ट्रवादीच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढवलेल्या धनराज महाले यांनी शिवसेनेत प्रवेश केलेला असताना आता यामुळे दोन्ही पक्षांसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

दरम्यान, याआधी राष्ट्रवादी काँग्रेसचे शिवेंद्रसिंहराजे भोसले, संदीप नाईक, मधुकर पिचड, त्यांचे पुत्र वैभव पिचड, आणि काँग्रेसचे आमदार कालिदास कोळंबकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी देखील भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

आरोग्यविषयक वृत्त –

You might also like