Nashik ACB Trap | 7/12 उताऱ्यावर नाव नोंदणी करण्यासाठी लाचेची मागणी, तलाठी अँन्टी करप्शनच्या जाळ्यात

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन – मृत्यूपत्र करुन लिहून दिलेल्या जमिनीच्या 7/12 उताऱ्यावर नाव नोंदणी करण्यासाठी पाच हजार रुपये लाच स्वीकारताना (Accepting Bribe) निफाड तालुक्यातील चितेगाव येथील तलाठ्याला नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Nashik ACB Trap) रंगेहाथ पकडले. महेश सहदेव गायकवाड Mahesh Sahdev Gaikwad (वय- 43) असे लाच घेताना पकडण्यात आलेल्या तलाठ्याचे नाव आहे. नाशिक एसीबीने (Nashik ACB Trap) ही कारवाई सोमवारी (दि.6) केली.

 

याबाबत निफाड तालुक्यातील चांदोरी येथील 32 वर्षाच्या व्यक्तीने नाशिक एसीबीकडे (Nashik ACB Trap) तक्रार केली आहे. तक्रारदार यांच्या आत्याने तक्रारदार तसेच त्यांचे वडील यांच्या नावे मौजे नागापूर येथील गट नंबर 337 मधील एक हेक्टर तीन आर तसेच गट नंबर 339 मधील एक हेक्टर पाच आर अशी शेती मृत्युपत्र करून लिहून दिली होती. या बाबत त्यांनी दुय्यम निबंधक निफाड यांचेकडे दस्त नोंदणी केला होता.

या जमिनीच्या उताऱ्यावर तक्रारदार व त्यांच्या वडिलांचे नाव नोंदणी करण्यासाठी तक्रारदार यांनी तलाठी महेश गायकवाड यांच्याकडे अर्ज केला होता.
उताऱ्यावर नाव नोंदणी करण्यासाठी गायकवाड यांनी तक्रारदार यांच्याकडे पाच हजार रुपये लाचेची मागणी केली.
तक्रारदार यांना लाच देणे मान्य नसल्याने त्यांनी नाशिक एसीबीकडे तक्रार केली. एसीबीच्या पथकाने पडताळणी केली
असता गायकवाड यांनी सातबारा उताऱ्यावर नाव नोंदणी करण्यासाठी पाच हजार रुपये लाच मागितल्याचे निष्पन्न झाले.
सोमवारी सापळा रचून तक्रारदार यांच्याकडून लाचेची रक्कम स्वीकारताना महेश गायकवाड यांना रंगेहाथ पकडण्यात आले.

 

ही कारवाई पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे-वालावलकर (SP Sharmistha Gharge-Walawalkar),
अपर पोलीस अधीक्षक नारायण न्याहळदे (Addl SP Narayan Nyahalde) पोलीस उपअधीक्षक नरेंद्र पवार (DySP Narendra Pawar)
यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदीप घुगे (Police Inspector Sandeep Ghuge)
पोलीस अंमलदार एकनाथ बाविस्कर, प्रकाश महाजन, नितीन नेटारे यांच्या पथकाने केली.

 

Advt.

Web Title :- Nashik ACB Trap | 7/12 demand for bribe to register on passage, Talathi caught by anti-corruption

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Pune NCP | महागाई विरोधात केंद्र सरकारच्या निषेधार्थ पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसची होळी (व्हिडिओ)

PMPML Strike | पीएमपीएमएलचा संप त्वरित मिटवा, आमदार रवींद्र धंगेकर यांची मागणी

Kolhapur Crime News | अनैतिक संबंधाच्या वादातून तरुणाच्या डोक्यात गोळी झाडून खून, कोल्हापूर जिल्ह्यातील धक्कादायक घटना