Nashik ACB Trap | 40 हजारांची लाच घेताना भूमी अभिलेखचा लिपिक ॲन्टी करप्शनच्या जाळ्यात

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन – काही दिवसांपूर्वीच पन्नास हजारांची लाच घेताना (Accepting Bribe) भूमी अभिलेखच्या (Land Records) जिल्हा अधीक्षकास नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने (Nashik ACB Trap) अटक केली होती. आता पुन्हा भूमी अभिलेखामधील लाचखोरीचे प्रकरण समोर आले आहे. भूमी अभिलेख कार्यालयातील प्रतिलिपी लिपिक (Clerk) निलेश शंकर कापसे Nilesh Shankar Kapse (वय- 37 रा. नवोदय को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी, प्लॉट नंबर 6, उदयनगर, मखमलाबाद रोड, नाशिक) याला 40 हजार रुपये लाच घेताना नाशिक एसीबीच्या (Nashik ACB Trap) पथकाने रंगेहाथ पकडले.

याबाबत नाशिक तालुक्यातील पळसे गाव येथील 30 वर्षाच्या व्यक्तीने नाशिक एसीबीकडे (Nashik ACB Trap) तक्रार केली आहे. तक्रारदार यांच्या वडिलांच्या मालकीच्या शेती गट क्रमांकांची मोजणी करून त्यामध्ये असलेले पोट हिस्स्याच्या खुणा दाखवून त्याबाबत कच्चा नकाशा काढून देण्यासाठी कापसे याने लाचेची मागणी केली. कापसे याने वैयक्तिक काम केले म्हणून प्रत्येक गटाचे दहा हजार याप्रमाणे चार गटांचे चाळीस हजार रुपये लाच मागितली. तसेच या नकाशावर शासकिय शिक्के व सही आणून देण्यासाठी प्रत्येक गटाचे 50 हजार याप्रमाणे दोन लाख रुपये लाचेची मागणी केली. परंतु तक्रारदार यांनी फक्त हद्दीच्या खुणा दाखवून देणेस सांगितल्याने कापसे याने प्रत्येक गटाचे दहा हजार याप्रमाणे चार गटांचे 40 हजार रुपये लाचेची मागणी करून लाच स्वीकारली.

ही कारवाई पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे-वालावलकर (SP Sharmistha Gharge-Walawalkar),
अपर पोलीस अधीक्षक नारायण न्याहळदे (Addl SP Narayan Nyahalde)
पोलीस उपअधीक्षक नरेंद्र पवार (DySP Narendra Pawar) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदीप घुगे
(Police Inspector Sandeep Ghuge), पोलीस अंमलदार एकनाथ बाविस्कर, प्रकाश महाजन,
नितीन नेटारे यांच्या पथकाने केली.

Web Title :- Nashik ACB Trap | Clerk of land record in anti-corruption net while taking bribe of 40 thousand

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Ajit Pawar | ‘विधीमंडळ सभागृहाच्या नियम, प्रथा-परंपरांचे पालन योग्य प्रकारे होत नाही; नियमांना बगल देण्याचे प्रकार वाढले’ – अजित पवार

Pune Kasba Peth Bypoll Election | कसब्यात शेवटच्या तासात मतदानाचा टक्का वाढला, भाजपने अखेरच्या क्षणी सामना फिरवला?

Kolhapur Crime News | कोल्हापुरात काका-पुतण्यामध्ये जोरदार भांडण; एकमेकांवर धारदार शस्त्राने केले वार