Nashik ACB Trap | 51 हजारांची लाच स्वीकारताना ठेकेदार पोलिसांच्या जाळ्यात; नाशिकमधील प्रकार

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन – जिल्ह्यात वीज मीटरचा 15 एचपी लोडवरून 40 एचपी लोड वाढवून देण्यासाठी रुपये 1 लाख 2 हजार लाचेची मागणी (Nashik ACB Trap) केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणात लाचखोर खासगी इसम याने तडजोड करत शेवटी 51 हजार लाच स्वीकारताना त्याला लाचलुचपत प्रतिबंधक (Nashik ACB Trap) विभागाच्या पोलिसांनी रंगेहात अटक केली आहे. सुधीर भास्कर पठारे (वय 34, व्यवसाय खासगी ठेकेदार, रा. देवळाली प्रवरा, ता. राहुरी, जिल्हा – अहमदनगर) असे लाचखोर ठेकेदाराचे नाव आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, तक्रारदार यांना त्यांच्या व्यवसायाकरिता वापरात असलेल्या वीज कनेक्शन मीटरचे 15 एचपी वरून ४० एचपी लोड वाढवून हवे होते. त्यासाठी त्यांनी रितसर अर्ज आणि पैसे भरले होते. पण, त्यांना ते वाढवून देण्याच्या मोबदल्यात आरोपी ठेकेदार पठारे याने आपल्या वैयक्तिक ओळखीचा फायदा घेत तक्रारदार यांना (दि. 3 डिसेंबर) रोजी 1 लाख 2 हजार रुपये लाचेची मागणी केली. या प्रकाराची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाल देण्यात आली.

त्यानुसार विभागाने सापळा रचून ठेकेदार पठारे याला पंचासमोर (दि. 5 डिसेंबर) रोजी रुपये 51 हजार लाच स्वीकारताना रंगेहात अटक केली. पठारे याच्यावर भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम 1988 चे कलम 7 अ प्रमाणे गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू आहे.

सदर कारवाई पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर, अपर पोलीस अधीक्षक एन. एस. न्याहळदे,
वाचक पोलीस उपअधीक्षक नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदीप घुगे,
पोलीस निरीक्षक गायत्री जाधव यांनी पोलीस हवालदार एकनाथ बावीस्कर, पोलीस नाईक प्रकाश महाजन,
पोलीस नाईक राजेंद्र गीते आणि पोलीस हवालदार संतोष गांगुर्डे यांच्या मदतीने केली.

Web Title :-  Nashik ACB Trap | Contractor in anti corruption net while accepting bribe of 51 thousand; Type in Nashik

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Accident News | दरी पुलाजवळ ट्रेलर उलटला; अडकलेल्या चालकाची अग्निशमन दलाकडून सुटका

Aurangabad ACB Tap | लाच घेताना पोलीस उपनिरीक्षकासह कर्मचारी अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

U-19 Women’s T20 WC | शफाली वर्माची Under 19 विश्वचषकासाठी महिला संघाच्या कर्णधारपदी नियुक्ती