Nashik ACB Trap | लाच घेताना महावितरणचा अभियंता अँन्टी करप्शनच्या जाळ्यात

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन – बिल्डिंग साइटवर नवीन मीटर आणि ट्रान्सफॉर्मर बसवण्यासाठी 17 हजार रुपये लाच घेताना महावितरण कंपनीच्या द्वारका उपविभागाच्या अतिरिक्त कार्यकारी अभियंत्याला नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Nashik ACB Trap) सापळा रचून रंगेहात पकडले. संजय मारुती धालपे (वय 44) असे लाच घेताना पकडलेल्या अधिकाऱ्याचे नाव आहे. नाशिक एसीबीच्या पथकाने (Nashik ACB Trap) ही कारवाई सोमवारी (दि.5) केली.

 

याबाबत 30 वर्षांच्या व्यक्तीने नाशिक एसीबीकडे गुरुवारी (दि.2) तक्रार दिली आहे. तक्रारदार यांच्या फर्मच्या बिल्डिंग साइटवर 41 वीज मीटर आणि ट्रान्सफॉर्मर बसवण्याच्या कामाला मंजुरी देण्यासाठी संजय धालपे यांनी प्रतिमीटर 500 प्रमाणे 20 हजार 500 रुपये लाचेची मागणी केली. तडजोडीअंती 17 हजार रुपये देण्याचे ठरले होते. तक्रारदार यांनी याबाबत नाशिक एसीबीकडे (Nashik ACB Trap) तक्रार केली.

नाशिक एसीबीच्या पथकाने सोमवारी पडताळणी केली असता, महावितरण कंपनीच्या द्वारका उपविभागाचा अतिरिक्त कार्यकारी अभियंता संजय धालपे याने प्रत्येक मीटर मागे 500 प्रमाणे 20 हजार 500 रुपये लाच मागून तडजोडीअंती 17 हजार रुपये लाच स्वीकारण्याचे कबूल केल्याचे निष्पन्न झाले. पथकाने सोमवारी सापळा रचून तक्रारदार यांच्याकडून 17 हजार रुपये लाच घेताना संजय धालपे यांना रंगेहात पकडले.

 

ही कारवाई पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर, अपर पोलीस अधीक्षक नारायण न्याहळदे,
पोलीस उपअधीक्षक नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक वसंतराव आदमाने,
पोलीस निरीक्षक प्रवीण महाजन, पोलीस अंमलदार नितीन कराड, नितीन नेटारे,
चालक परशुराम जाधव यांच्या पथकाने केली.

 

Web Title :- Nashik ACB Trap | Mahavitaran engineer caught in anti-corruption net while taking bribe

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Chandrashekhar Bawankule | ‘मागासवर्गीय समाजाला स्वतःचे हित कळतं…’; चंद्रकांत बावनकुळेंची प्रतिक्रिया

ShivendraRaje Bhosale | उदयनराजे भोसलेंच्या आंदोलनामागे कोण?; काही राजकीय स्वार्थ… – शिवेंद्रराजे भोसले

Kirit Somaiya | शिवाजी महाराजांबद्दल बोलताना काळजी घेतलीच पाहिजे – किरीट सोमय्या