नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन – Nashik ACB Trap | सिन्नर नगरपरिषदेच्या (Sinnar Nagar Parishad) मुख्याधिकार्याच्या विरूध्द 5 हजार रूपयाच्या लाच मागणी प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संजय महादेव केदार Sanjay Mahadev Kedar (44, पद – मुख्याधिकारी, नेमणूक – सिन्नर नगरपरिषद, सिन्नर, जि. नाशिक. रा. नाशिक) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. (Nashik ACB Trap)
याबाबत अधिक माहिती अशी की, तक्रारदार यांनी सिन्नर नगरपालिकेत सादर केलेल्या रो हाऊस बांधकाम परवानगीच्या फाईलला मंजुरी देण्याच्या मोबदल्यात 1 युनिट म्हणजे एका रो हाऊसचे 1 हजार रूपये याप्रमाणे पाच रो हाऊसचे एकुण 5 हजार रूपयाच्या लाचेची मागणी केली (Nashik Bribe Case). तक्रारदाराची इच्छा नसल्याने त्यांनी अॅन्टी करप्शन विभागाकडे (Anti Corruption Bureau Maharashtra) तक्रार दिली (Nashik Crime News). त्यानंतर तक्रारीच्या पडताळणी दरम्यान मुख्याधिकारी संजय महादेव केदार यांनी सरकारी संपचासमक्ष तक्रारदाराकडे 5 हजार रूपयाच्या लाचेची मागणी करून ती घेण्याचे मान्य केले. (Nashik ACB Trap)
अॅन्टी करप्शन विभागाने संजय केदार यांच्याविरूध्द गुन्हा दाखल केला आहे.
नाशिक परिक्षेत्राच्या पोलिस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे-वालावलकर (SP Sharmistha Walawalkar),
अप्पर पोलिस अधीक्षक नारायण न्याहाळदे (Addl SP Narayan Nyahalde), पोलिस उप अधीक्षक नरेंद्र पवार (DySP Narendra Pawar)
यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक मीरा आदमाने (PI Meera Admane), पोलिस हवालदार चंद्रशेखर मोरे,
पोलिस नाईक प्रवीण महाजन, प्रभाकर गवळी, चालक हे. कॉ. संतोष गांगुर्डे यांनी ही कारवाई केली आहे.
Web Title :- Nashik ACB Trap | Nashik Anti-Corruption Bureau: Anti-corruption department Maharashtra – Sinnar Nagar Parishad chief officer Sanjay Mahadev Kedar in case of bribery
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Ambadas Danve | ‘सभेला कुणी आडवं आलं तर…’, पाचोऱ्यातील सभेपूर्वी अंबादास दानवेंचा शिंदे गटला इशारा