Nashik ACB Trap | अनुदान प्रकरण मंजूर करण्यासाठी लाचेची मागणी, चांदवड पंचायत समितीमधील अधिकारी अँन्टी करप्शनच्या जाळ्यात

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन – जनावरांच्या गोठ्यासाठी शासकीय अनुदान प्रकरण मंजूर करुन देण्याच्या कामाच्या मोबदल्यात चार हजार रुपये लाच स्वीकारताना (Accepting Bribe) चांदवड पंचायत समिती (Chandwad Panchayat Samiti) मधील सहायक कार्यक्रम अधिकाऱ्याला (कंत्राटी) नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Nashik ACB Trap) सापळा रचून रंगेहाथ पकडले. नामदेव विश्वनाथ शिंदे Namdev Vishwanath Shinde (वय 42) असे लाच घेताना पकडण्यात आलेल्या अधिकाऱ्याचे नाव आहे. नाशिक एसीबीने (Nashik ACB Trap) ही कारवाई शुक्रवारी (दि.17) केली.

 

याबाबत 28 वर्षाच्या व्यक्तीने नाशिक एसीबीकडे (Nashik ACB Trap) तक्रार केली आहे. तक्रारदार यांचे वडिलांनी महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेअंतर्गत (Mahatma Gandhi Rashtriya Gramin Rojgar Hami Yojana) जनावरांचे गोठ्यासाठी शासकीय अनुदान प्रकरण दाखल केले आहे. हे प्रकरण मंजूर करून देण्याच्या कामाच्या मोबदल्यात नामदेव शिंदे याने 5 हजार रुपये लाचेची मागणी केली. तडजोडी अंती चार हजार रुपये देण्याचे ठरले. याबाबत तक्रारदार यांनी नाशिक एसीबीकडे तक्रार केल्यानंतर पथकाने पडताळणी केली. त्यावेळी नामदेव शिंदे याने पाच हजार रुपये लाचेची मागणी करुन तडजोडी अंती चार हजार रुपये लाच स्वीकारण्याचे कबूल केले. एसीबीच्या पथकाने सापळा रचून तक्रारदार यांच्याकडून चार हजार रुपये लाच घेताना शिंदे याला रंगेहाथ पकडले.

ही कारवाई पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे-वालावलकर (SP Sharmistha Gharge-Walawalkar),
अपर पोलीस अधीक्षक नारायण न्याहळदे (Addl SP Narayan Nyahalde) पोलीस उपअधीक्षक नरेंद्र पवार (DySP Narendra Pawar)
यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप अधीक्षक वैशाली पाटील (Deputy Superintendent of Police Vaishali Patil),
पोलीस निरीक्षक अनिल बागुल (Police Inspector Anil Bagul), पोलीस निरीक्षक राजेश गीते (Police Inspector Rajesh Geete),
पोलीस अंमलदार शरद हेंबाडे, अजय गरुड यांच्या पथकाने केली.

 

Web Title :- Nashik ACB Trap | Officials in Chandwad Panchayat Samiti caught in anti-corruption net for demanding bribe to approve grant case

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Pimpri Chinchwad Crime | पिंपरी चिंचवडमध्ये झळकले कुख्यात गुन्हेगार नीलेश घायवळच्या वाढदिवसाचे बॅनर्स, प्रचंड खळबळ

MP Supriya Sule | खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडून राष्ट्रपतींना दौंड आणि इंदापूर भेटीचे निमंत्रण

Mohan Joshi Pune | ‘पराभवाच्या भीतीने भाजपने कॅन्टोन्मेंट बोर्डच्या निवडणुका पुढे ढकलल्या’ – मोहन जोशी