Nashik ACB Trap | 3000 हजार रुपये लाच घेताना पोलीस कर्मचारी अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

मालेगाव : पोलीसनामा ऑनलाइन – गंभीर स्वरुपाचा गुन्हा (FIR) दाखल न करण्यासाठी तीन हजार रुपये लाच घेताना (Accepting Bribe) नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Nashik ACB Trap) पोलीस नाईक तानाजी मोहन कापसे (Police Naik Tanaji Mohan Kapse) याला रंगेहात पकडले. नाशिक एसीबीने (Nashik ACB Trap) ही कारवाई बुधवारी (दि.7) मालेगाव येथील खड्डाजिन रोडलगत (Khadajin Road Malegaon) असलेल्या मजदूर कॅन्टीन येथे केली.

याबाबत तक्रारदार यांनी नाशिक एसीबीकडे तक्रार (Nashik ACB Trap) केली आहे. तानाजी कापसे हे मालेगाव शहरातील किल्ला पोलीस ठाण्यात (Killa Police Station) पोलीस नाईक म्हणून कार्यरत आहेत. तक्ररादार यांच्यावर गंभीर स्वरुपाचा गुन्हा दाखल न करण्यासाठी आणि कारवाईत मदत करण्यासाठी कापसे यांनी तक्रारदार यांच्याकडे तीन हजार रुपये लाच मागितली. मात्र, तक्रारदार यांना लाच देणे मान्य नसल्याने त्यांनी नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयात (Anti Corruption Bureau (ACB) Nashik) लेखी तक्रार केली.

प्राप्त तक्रारीची पडताळणी केली असता तानाजी कापसे याने लाच मागितल्याचे निष्पन्न झाले.
त्यानुसार पथकाने बुधवारी मालेगाव सिव्हिल हॉस्पिटल व खड्डा जीन रोड लगतच्या मजदूर कॅन्टीन जवळ सापळा रचला.
तक्रारदार यांच्याकडून तीन हजार रुपये लाच घेताना पथकाने कापसे याला रंगेहात पकडले.
तानाजी कापसे यांच्याविरुद्ध आज (गुरुवार) मालेगाव शहर पोलीस ठाण्यात (Malegaon City Police Station) भ्रष्टाचार प्रतिबंध कायद्यांतर्गत (Prevention of Corruption Act) गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे.

 

Web Title :- Nashik ACB Trap | Police Naik Tanaji Mohan Kapse anti-corruption trap while taking bribe of 3000 thousand rupees

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Bhaskar Jadhav | शिवसेना-भाजप संघर्ष पेटण्याची चिन्हं, शिवसेनेचे आक्रमक नेते भास्कर जाधवांविरोधात FIR

 

Wonder Drinks Mixture | रोज प्या दूध, बडीशेप आणि खडीसाखरचे ड्रिंक, आयुष्यासाठी वरदानपेक्षा नाही कमी

 

Pune Police | 12 वर्षानंतर परदेशातून आलेली महिला सुखरुप घरी, पुणे पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी