Nashik ACB Trap | 50 हजारांची लाच घेताना भूमी अभिलेखचे अधीक्षक अँन्टी करप्शनच्या जाळ्यात

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन – शेत जमिनीचा भूमि अभिलेख कार्यालयाने तयार केलेला हिसा नमुना 12 मध्ये लिखाण प्रमादाची चूक दुरुस्त करण्यासाठी भूमी अभिलेख विभागाचा अधीक्षक (Superintendent of Land Records) महेशकुमार महादेव शिंदे (Mahesh Kumar Mahadev Shinde) आणि लिपिक अमोल भीमराव महाजन (Clerk Amol Bhimrao Mahajan) यांना 50 हजार रुपये लाच घेताना (Accepting Bribe) नाशिक एसीबीच्या (Nashik ACB Trap) पथकाने सापळा रचून रंगेहात पकडले. नाशिक एसीबीच्या (Nashik ACB Trap) पथकाने ही कारवाई मंगळवारी (दि.31 जानेवारी) शिंदे यांच्या कार्यालयीन दालनात केली. (Nashik Bribe Case)

 

याबाबत तक्रारदार यांनी नाशिक एसीबीकडे (Nashik ACB Trap) लेखी तक्रार केली आहे. तक्रारादार यांच्या वडिलांच्या नावे असलेल्या शेत जमिनीचा भूमि अभिलेख कार्यालयाने तयार केलेला हिसा नमुना 12 मध्ये लिखाण प्रमादाची चूक झाली होती. ही चूक दुरुस्तीचे आदेश देण्यासाठी महेशकुमार शिंदे यांनी 1 लाख 80 हजार रुपये लाचेची मागणी केली. तडजोडी अंती एक लाख रुपये देण्याचे ठरले होते.

तक्रारदार यांनी नाशिक एसीबीकडे तक्रार दिल्यानंतर पथकाने पडताळणी केली. त्यावेळी भूमि अभिलेख जिल्हा अधीक्षक महेशकुमार शिंदे याने तक्रारदार यांच्याकडे 1 लाख 80 हजार रुपये लाचेची मागणी करुन तडजोडी अंती 1 लाख रुपये लाच मागतिली. त्यापैकी 50 हजार रुपये लाच घेताना शिंदे यांना त्यांच्या दालनात रंगेहात पकडण्यात आले. तर लिपीक अमोल महाजन याने तक्रारदाराला लाच देण्यासाठी प्रोत्साहित केले. दोघांविरुद्ध बुधवारी (दि.1 फेब्रुवारी) सरकारवाडा पोलीस ठाण्यात (Sarkarwada Police Station) भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत (Prevention of Corruption Act) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास एसीबीचे पोलीस निरीक्षक गायत्री जाधव (Police Inspector Gayatri Jadhav) करीत आहेत.

 

ही कारवाई पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे-वालावलकर (SP Sharmistha Gharge-Walawalkar),
अपर पोलीस अधीक्षक नारायण न्याहळदे (Addl SP Narayan Nyahalde)
पोलीस उपअधीक्षक नरेंद्र पवार (DySP Narendra Pawar) यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक एसीबीच्या पथकाने केली.

 

Web Title :- Nashik ACB Trap | Superintendent of land records in anti-corruption net while taking bribe of 50 thousand

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

BJP MLA Nitesh Rane | उद्धव ठाकरेंवर टीका करताना नितेश राणेंची जीभ घसरली, म्हणाले-‘उद्धव ठाकरे हे नाXX…’

NCP MLA Rohit Pawar | ‘बागेश्वर बाबाला उपरती झाली, पण मुंबईत बसलेल्या बाबाला…’ रोहित पवारांचा राज्यपालांना टोला

Pune By Elections | कसब्याची जागा आपल्या पारड्यात पाडून घेण्यासाठी महाविकास आघाडीत रस्सीखेच! इच्छुकांची मोठी यादी