Nashik ACB Trap | लाच घेताना मनमाड नगरपरिषदेतील तीन कर्मचारी अँन्टी करप्शनच्या जाळ्यात

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन – कन्स्ट्रक्शन फर्मच्या (Construction Firm) बिलाचा चेक तयार करुन काढून देण्यासाठी 36 हजार रुपये लाच घेताना (Accepting Bribe) मनमाड नगरपरिषदेच्या (Manmad Municipal Council) तीन कर्मचाऱ्यांना नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Nashik ACB Trap) सापळा रचून रंगेहाथ पकडले. यामध्ये नगरपरिषदेमधील लेखा विभागाचे (Accounting Department) वरिष्ठ लिपिक (Senior Clerk), रोखपाल (Cashier) आणि शिपाई यांचा समावेश आहे. नाशिक एसीबीने (Nashik ACB Trap) ही कारवाई शुक्रवारी (दि.3) केली. एकाच वेळी तीन कर्मचाऱ्यांना लाच घेताना पकडल्याने नगरपरीषदेत खळबळ उडाली आहे.

वरिष्ठ लिपिक आनंद प्रभाकर औटी Anand Prabhakar Auti (वय-46), रोखपाल संजय बबन आरोटे Sanjay Baban Arote (वय- 52) आणि शिपाई नंदू पंडीत म्हस्के Nandu Pandit Mhaske (वय- 58) असे लाच घाणाऱ्या कर्मचाऱ्यांची नावे आहेत. याबाबत नांदगाव तालुक्यातील मनमाड येथील 52 वर्षीय व्यक्तीने नाशिक एसीबीकडे (Nashik ACB Trap) तक्रार गुरुवारी (दि.2) तक्रार केली आहे.

तक्रारदार हे काम करत असलेल्या कन्स्ट्रक्शन फर्म चे बिल नगरपरिषद कार्यालय मनमाड येथे जमा करण्यात आले होते. या कामाच्या बिलाचा चेक तयार करून चेक काढून दिल्याच्या मोबदल्यात तिघांनी टक्केवारीनुसार 36 हजार रुपये लाचेची मागणी केली. तक्रारदार यांना लाच देणे मान्य नसल्याने त्यांनी नाशिक एसीबीकडे तक्रार केली.

एसीबीच्या पथकाने शुक्रवारी पंचासमक्ष पडताळणी केली असता वरिष्ठ लिपिक आनंद औटी, रोखपाल संजय आरोटे आणि शिपाई नंदू म्हस्के यांनी टक्केवारीनुसार 36 हजार रुपये लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. एसीबीच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचला. आरोटे आणि म्हस्के यांना तक्रारदार यांच्याकडून लाचेची रक्कम घेताना रंगेहाथ पकडले. तिघांवर भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे.

Advt.

ही कारवाई पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे-वालावलकर (SP Sharmistha Gharge-Walawalkar),
अपर पोलीस अधीक्षक नारायण न्याहळदे (Addl SP Narayan Nyahalde)
पोलीस उपअधीक्षक नरेंद्र पवार (DySP Narendra Pawar)
यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप अधीक्षक पोलीस निरीक्षक अनिल बागुल
(Police Inspector Anil Bagul) पोलीस अंमलदार किरण अहिरराव,
अजय गरूड, परशुराम जाधव यांच्या पथकाने केली.

Web Title :- Nashik ACB Trap | Three employees of Manmad municipal council in anti-corruption net while taking bribe

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | खुन व मोक्का गुन्ह्यातील फरार आरोपीला कोंढवा पोलिसांकडून अटक

Deepika Padukone | ‘ऑस्कर 2023’मध्ये अभिनेत्री दीपिका पादुकोण दिसणार ‘या’ भूमिकेत; पोस्ट शेअर करत दिली माहिती

Ravindra Dhangekar | आमदार झाल्यानंतर रवींद्र धंगेकरांनी घेतली गिरीश बापट यांची भेट, बापटांनी दिला ‘हा’ कानमंत्र (व्हिडिओ)