Nashik ACB Trap | नाशिक भूमि अभिलेखचे आणखी दोन अधिकारी आणि खासगी एजंट अँन्टी करप्शनच्या जाळ्यात

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन – काही दिवसांपूर्वी नाशिक भूमिअभिलेख मधील दोन जणांना नाशिक एसीबीच्या (Nashik ACB Trap) पथकाने लाच घेताना पकडले होते. हे प्रकरण ताजे असतानाच नाशिक एसबीच्या पथकाने आणखी दोन जणांना पकडल्याने खळबळ उडाली आहे. एसबीच्या (Nashik ACB Trap) अधिकाऱ्यांनी त्र्यंबकेश्वर भूमीअभिलेख कार्यालयात (Trimbakeshwar Land Records Office) कारवाई करुन शिरस्तेदार, भू करमापक आणि खासगी एजंटला ताब्यात घेतले.

शिरस्तेदार दौलत नथू समशेर Daulat Nathu Samsher (वय 43 रा. फ्लॅट नं 6, चैत्र चंद्र अपार्टमेंट, समर्थ नगर, वडाळा पाथर्डी रोड, इंदिरा नगर, गोकुळ हॉस्पिटल जवळ, नाशिक), भू करमापक भास्कर प्रकाश राऊत Land Surveyor Bhaskar Prakash Raut (वय 56 रा. रो हाऊस नं 3,4, रामकुंज अपार्टमेंट, रामकृष्ण नगर, राम मंदिर जवळ, चुचले शिवार, अंबड नाशिक), खासगी एजंट वैजनाथ नाना पिंपळे Private Agent Vaijnath Nana Pimple (वय 34 रा. रो हाऊस नंबर 1, ऋषिराज रो हाऊस, शांतीनगर, मखमलाबाद रोड, नाशिक) असे लाच मागणाऱ्यांची नावे आहेत. याबाबत 62 वर्षाच्या तक्रारदाराने नाशिक एसीबीकडे (Nashik ACB Trap) तक्रार केली आहे.

फायनल लेआउट मध्ये त्रुटी दाखवून शेजारील गटातील क्षेत्र आपल्या गटात सरकू देऊ नये,
अशी मागणी तक्रारदार यांनी केली होती. त्या मोबदल्यात समशेर व राऊत यांनी 10 लाख रुपये लाचेची मागणी
(Demanding a Bribe) केली. तडजोडी अंती 6 लाख रुपयांची मागणी केली. मात्र तक्रारदार तयार झाले नाहीत.
अखेर 3 लाख रुपये देण्याचे ठरले. तक्रारदार यांना लाच देणे मान्य नसल्याने त्यांनी नाशिक एसीबीकडे तक्रार केली.

एसबीच्या अधिकाऱ्यांनी 29 डिसेंबर 2022, 11 व 16 जानेवारी 2023 रोजी पडताळणी केली असता समशेर व राऊत यांनी 10 लाखाची मागणी करुन तडजोडी अंती 6 लाख व नंतर 3 लाख रुपये लाचेची मागणी केली. लाचेची रक्कम खासगी एजंट पिंगळे हा स्वीकारणार होता. आरोपींनी लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाल्यावर एसीबीने तिघांवर कारवाई केली.

Advt.

ही कारवाई पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे-वालावलकर (SP Sharmistha Gharge-Walawalkar),
अपर पोलीस अधीक्षक नारायण न्याहळदे (Addl SP Narayan Nyahalde) पोलीस उपअधीक्षक नरेंद्र पवार
(DySP Narendra Pawar) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गायत्री मधुकर जाधव,
पोलीस निरीक्षक संदीप घुगे (Police Inspector Sandeep Ghuge), पोलीस निरीक्षक अनिल बागुल
(Police Inspector Anil Bagul) पोलीस अंमलदार प्रकाश महाजन (Police Officer Prakash Mahajan),
किरण अहिरराव, अजय गरुड, परशुराम जाधव यांच्या पथकाने केली.

Web Title :  Nashik ACB Trap | Two more officials of Nashik land records and a private agent in the net of anti-corruption

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

MP Imtiyaz Jaleel | एमआयएमचे खासदार इम्‍तियाज जलील यांच्यावर गुन्हा दाखल

Pune Crime News | बलात्कार करुन ब्लॅकमेल करुन जबरदस्तीने केले लग्न; नांदण्यासाठी येण्यासाठी व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी