Nashik Accident News | दुर्देवी ! गाडीवर झाड कोसळल्याने 3 शिक्षकांचा जागीच मृत्यू; 12 वीच्या निकालाच्या होते तयारीत

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन – Nashik Accident News | सुट्टीचा दिवस असताना 12 वीचा निकाल (HSC result) तयार करण्यासाठी गेलेल्या शिक्षकांच्या गाडीवर (teacher’s car) झाड कोसळले या दुर्घटनेत गाडीमधील तीन शिक्षकांचा जागीच मृत्यू (Death) झाला. ही दुर्घटना वणी-नाशिक रोडवर (Wani-Nashik Road) वलखेड फाट्याजवळ फॉर्च्यून कंपनी समोर आज (बुधवार) सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास घडली. वाळलेले झाड ईरटीका (एमएच 15 एफएन 0997) गाडीवर (Nashik Accident News) कोसळले.

दत्तात्रय गोकुळ बच्छाव (वय-51), रामजी देवराम भोये (वय-49), नितीन सोमा तायडे (वय-32 सर्व रा. रासबिरारी, लिंक रोड, नाशिक) अशी मृत्यू झालेल्यांची नावे आहे. हे सर्वजण सुरगणा (Surgana) येथे शहीद भगतसिंग माध्यमिक व उच्च माध्यमिक हायस्कूल अलंगून येथे कार्यरत होते. ते रोज अप-डाऊन करत होते. या अपघाताची नोंद दिंडोरी पोलीस ठाण्यात (Dindori Police Station) करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आगामी बारावीचा निकाल तयार करण्यासाठी हे सर्व शिक्षक नाशिकहून अलंगूनला गेले होते.
आज सायंकाळी पाचच्या सुमारास पावसात अलंगुन येथून शाळेतून नाशिकला घरी येत होते.
वलखेड फाट्याजवळ फॉर्च्युन कंपनी (Fortune Company) जवळ एक जने वाळलेले झाड त्यांच्या गाडीवर पडले. यामध्ये तिघांचा जागीच मृत्यू झाला.
तर पुढच्या सीटवर बसलेले किरकोळ जखमी झाले.

Web Title :- Nashik Accident News | 3 teachers killed when a tree fell on a vehicle at wani nashik road

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Supreme Court | महाराष्ट्र सरकारला उपचाराचे दर ठरवण्याचा अधिकार नाही

‘या’ पद्धतीने आणि नाण्यांच्या बदल्यात मिळताहेत 1900 रुपयांपासून 1.5 लाख, तुमच्याकडे असतील तर ताबडतोब करा ‘हे’ काम

Earthquake | काही तासात देशात 5 ठिकाणी भुकंपाचे धक्के; बिकानेर, मेघालय तीव्र धक्क्याने हादरला