Nashik Accident News | देवदर्शनाहून परतताना बसचा टायर फुटून भीषण अपघात; दुचाकीस्वराचा मृत्यू

नाशिक : पोलीसनामा ऑनलाईन – Nashik Accident News | राज्यात अपघाताचे सत्र सुरूच आहे. नाशिक जिल्ह्यात पुन्हा एक भीषण अपघात झाला आहे. यामध्ये खासगी बसचा टायर फुटून अपघात झाला आहे. देवदर्शनाहून परतताना हा अपघात घडला आहे. या अपघातात एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला आहे, तर दोन जण जखमी झाले आहेत. या अपघातातील जखमींना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. नाशिक-त्र्यंबकेश्वर रोडवरील बेलगाव ढगा परिसरात हा अपघात झाला आहे. (Nashik Accident News)

देवदर्शनाहून परतताना काळाचा घाला
हि खासगी वाहतूक करणारी बस प्रवाशांना घेऊन त्र्यंबकेश्वरहुन देवदर्शन करून पुन्हा नाशिकच्या दिशेने निघाली होती. यादरम्यान हि बस बेलगाव ढगा फाट्याजवळील एस्पालिअर स्कुल जवळ आली असताना या बसचा टायर फुटला. यामुळे बस अनियंत्रित झाल्यामुळे बस थेट डिव्हायडर तोडून दुसऱ्या लेनमध्ये घुसली. यामुळे या बसने नाशिकहून त्र्यंबकेश्वरकडे जाणाऱ्या दोन दुचाकींना धडक दिली आणि झाडावर जाऊन आदळली. या अपघातात एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला तर दोन जण जखमी झाली आहेत. या अपघातातील जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. (Nashik Accident News)

दोन दिवसांपूर्वी झाला होता भीषण अपघात
दोन दिवसांपूर्वी वणी सापुतारा मार्गावर भीषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये एकाच कुटुंबातील
तिघांना आपला जीव गमवावा लागला आहे. यामध्ये एका आठ महिन्याच्या चिमुरडीचा समावेश आहे.
या घटनेमुळे सगळीकडे हळहळ व्यक्त केली जात आहे.

Web Title : Nashik Accident News | nashik accident in belgaum dhaga area on nashik trimbakeshwar road bus broke divider and hit bike

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Shrimant Dagdusheth Ganpati | ‘दगडूशेठ’ गणपती मंदिरात २ हजार किलो द्राक्षांची आरास; संकष्टी चतुर्थीनिमित्त द्राक्ष महोत्सवाचे आयोजन

Pune Crime News | कागदपत्रावर सही करण्यासाठी एजंटची आरटीओ निरीक्षकाला मारहाण; फुलेनगरमधील आरटीओ कार्यालयातील प्रकार

Kolhapur ACB Trap | फसवणुकीच्या गुन्ह्यात ८ लाखांची लाच घेताना एपीआयसह दोघांना पकडले; जुना राजवाडा पोलीस ठाण्यात मध्यरात्री कारवाई

Pune Crime News | मैत्रिणीने दोघांबरोबर शारीरीक संबंध ठेवण्यास भाग पाडण्याचा केला प्रयत्न; विनयभंगाचा तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

Pune Crime News | दुसरे लग्न करण्यास विरोध केल्याने वडिलांनी केला १३ वर्षाच्या मुलीचा विनयभंग; वडिल, आजीविरोधात गुन्हा दाखल