नाशिक : मातोरी येथील ‘त्या’ घटनेचा लासलगावातील आंबेडकरवादी संघटनेच्या वतीने तीव्र निषेध

लासलगांव : पोलीसनामा ऑनलाइन  – नाशिक येथील मातोरी फार्म हाऊस येथे रात्री उशिरापर्यंत डीजे वाजवण्यास नकार देण्याच्या वादातून दहा ते बारा जणांच्या टोळक्याने डीजे चालकास मारहाण केली झालेल्या घटनेचा लासलगाव मधील सर्व सामाजिक, धार्मिक, राजकीय संघटनेच्यावतीने तीव्र शब्दात निषेध व्यक्त करण्यात आला. लासलगाव येथील सहायक पोलीस निरीक्षक खंडेराव रंजवे यांना निवेदन देऊन सदर गुन्हेगारांवर कठोर कारवाई करण्याची मागणी सर्व आंबेडकरी संघटनेच्यावतीने करण्यात आली. या प्रसंगी त्यांनी निवेदनाचा स्वीकार करून आंबेडकरवादी संघटनेची मागणी प्रशासनाकडे करण्याचे आश्वासन दिले.सदर प्रसंगी विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी गुन्हेगारांवर कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी केली व तीव्र शब्दात आपल्या भावना व्यक्त करून गुन्हेगारांवर व गुन्हेगारी प्रवृत्तीवर शासनाने पायबंद घालावेत. अशी मागणी सर्वांच्या वतीने करण्यात आली सदर मागणीचे निवेदन महिला मंडळाच्या वतीने देण्यात आले.

याप्रसंगी महिला मंडळाच्या तुळसा शेजवळ, निर्मला शेजवळ, भारती शेजवळ, शैला अहीरे, मनीषा शेजवळ, सविता शेजवळ, अविता शेजवळ, विमल शेजवळ, रमण शेजवळ, सुशीला शेजवळ, माया केदारे, प्रज्ञा शेजवळ, आरपीआयचे शहराध्यक्ष रामनाथ शेजवळ, भारिप बहुजन महासंघाचे सोनू शेजवळ, विलास खैरणार, सागर आहिरे, नितीन शेजवळ, भारतीय बौद्ध महासभेचे शहराध्यक्ष प्रकाश संसारे, सिद्धार्थ शेजवळ, सलमान पठाण, वसीम सय्यद, निलेश शेजवळ, शरद शेजवळ, सोनू ठेंगे, अमोल गीते, शहजाद पठाण, रामदास नेटारे,  प्रकाश कळसे, पप्पू जाधव, सुभाष पवार, अरबाज मनियार, युसुफ तांबोळी, केशव पवार, राजेंद्र पगारे, रवींद्र जाधव, हर्षद शेख, श्याम साळवे,  प्रशांत शेजवळ, शाहरुख सय्यद, राहुल केदारे, सनी शेजवळ, साहेबराव केदारे, योगेश निकाळे, दिलीप जाधव, राजेंद्र सोनवणे आदी विविध संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/

 

You might also like