खळबळजनक ! लग्न सोहळयात वधूची बहिणच ‘कोरोना’ पॉझिटिव्ह निघाली, पण…

पोलिसनामा ऑनलाईन टीम – नाशिक येथे रॅपिड अँटिजेंन टेस्टद्वारे सुरु असलेल्या तपासणी शिबिरात नवरीची बहिणच कोरोनाबाधित आढळून आली. त्यामुळे होणार्‍या लग्नसमारंभातील असंख्य वर्‍हाडी मंडळी कोरोनाचा प्रादुर्भाव होण्यापासून बचावले आहेत. सिडकोत ही तपासणी झाली. महिलेचे विलगीकरण करून उपचार सुरू झाल्यामुळे नातेवाईकांचा जीव भांड्यात पडला.

नाशिक येथील सिडकोतील प्रभागांमध्ये नगरसेवकांनी आरोग्य तपासणी मोहीम हाती घेतली आहे. यामुळे कोरोनाच्या धास्ती बाळगणारे नागरीक हळूहळू घराबाहेर पडून तपासणी करू लागले आहे. त्यातील काहीजण निगेटिव्ह येत असल्याने त्यांचा आत्मविश्वास वाढत आहे. असाच काहीसा धक्कादायक प्रसंग एका ठिकाणी कोरोना चाचणी शिबिरात निदर्शनास आला. यामुळे होणार्‍या लग्नसमारंभातील वर्‍हाडी मंडळी कोरोनाच्या प्रादुर्भाव होण्यापासून दूर राहिली आहे.

महिलेची चाचणी करण्यात आली. त्यामध्ये ती पॉझिटिव्ह आली. नेमके याच महिलेच्या बहिणीचे गुरुवारी लग्न होते. त्यामुळे या महिलेचे घरी विलगीकरण करण्यात आले. तिच्यावर डॉक्टरांच्या माध्यमातून ऑनलाईन उपचार सुरू आहे. वेळीच चाचणी झाल्याने लग्नात अन्य मंडळी बाधित होण्यापासून बचावल्याची प्रतिक्रिया शिबिराचे आयोजक नगरसेवक मुकेश शहाणे यांनी व्यक्त केली.