एकाच वेळी 2 ‘जावा’ झाल्या ‘विधवा’ अन् ‘संसार’ झाले उध्दवस्त, नाशिकच्या अपघातात 25 जणांचा मृत्यू

नाशिक : पोलीसनामा ऑनलाईन – बस आणि अ‍ॅपे रिक्षाची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात २५ जण ठार झाले आहेत. सर्व मृत व्यक्ती बसमधील प्रवासी आहेत. सर्व मृतदेह बाहेर काढण्यात आले आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून अनेकांच्या घरात शोककळा पसरली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या अपघातात दोन सख्खा भावांचा मृत्यू झाला असून दोघांच्या पत्नी बचावल्या असल्याची बातमी समोर येत आहे. चुलत भावजयीच्या अंत्यविधीवरुन परत येताना निकम बंधूंवर काळाने घाला घातला आहे. बाळासाहेब चिंधा निकम आणि त्यांचे धाकटे बंधू शांताराम चिंधा निकम हे सलून व्यावसायिक आहेत. या दोघांचाही अपघातात मृत्यू झाला आहे. अंत्यविधी आटोपल्यानंतर निकम कुटुंब कळवणला यायला निघालं होतं. त्यावेळी बसच्या अपघातामध्ये दोन भावांचा जीव गेला पण दोन्ही भावजया बचावल्या आहेत.

मालेगावहून कळवनकडे जाणारी कळवण आगाराची ही बस होती. बस चालकाचा वाहनावरील ताबा सुटला आणि तितक्यात बससमोर आलेल्या रिक्षावर धडक बसली. या अपघातात मालेगाव येथील अन्सारी कुटुंबातील ८ जण मयत झाले आहे. हे कुटुंब आपल्या परिवारातील मुलासाठी मुलगी बघण्याच्या अर्थात लग्न जमवण्यासाठी देवळा इथे आले होते. तो कार्यक्रम आटपून परतत असताना त्यांच्या कुटुंबावर काळाने घाला घातला. तर वैवाहिक जीवन सुरू होण्याआधीच तरुणाचाही मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे.

यात अ‍ॅपे रिक्षातील ९ आणि बसमधील ४८ प्रवासी अडकले होते. मेशी फाट्याजवळ हा अपघात झाला. बस आणि रिक्षा चालकाचं नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला. अपघातानंतर दोन्ही वाहने विहिरीत कोसळली. अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेत बसमध्ये अडकलेल्यांना बाहेर काढण्यास सुरुवात केली. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

फेसबुक पेज लाईक करा