विश्वास नांगरे-पाटील यांच्या सोशल पोलिसिंगला ‘आव्हान’ ?

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन – महाराष्ट्रात कोरोनाच्या धसक्याने राज्यातील काही शहरे बंद ठेवण्यात आली आहे. तसेच नाशिकमध्येही अनेक व्यवसाय बंद ठेवले गेले आहे. याच अघोषित बंदचा फायदा वेगळ्या पद्धतीने घेतला जात असून, नाशिकमध्ये राजरोजसपणे अवैध धंदे सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे.

नाशिमधल्या भद्रकाली भागात अनेक ठिकाणी बिनधास्तपणे अवैध धंदे सुरु आहे. यात सट्टा, मटका आणि जुगाराचाही समावेश आहे. व्हिडीओ गल्लीमध्येसुद्धा पार्लर सुरू असून जुगार सुरु आहे. विशेष म्हणजे या सगळ्या प्रकाराकडे पोलीस दुर्लक्ष करत असल्याचं दिसत आहे.

कत्तल खाना, खोका मार्केट भागातील अवैध धंद्यावर देखील जास्त प्रमाणात गर्दी होत आहे. मात्र एवढं चित्र स्पष्टपणे समोर आल्यानंतर जे आम्हाला दिसतं ते पोलीस प्रशासनाला का दिसत नाही ? असा संताप सवाल नाशिकमधील सर्वसामान्य नागरिक विचारत आहे. त्यामुळे नाशिकचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी पोलीसांना सोशल पोलिसिंगला करण्याचे आवाहन केले आहे.

दरम्यान, पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी पोलीस व नागरिक यांच्यातील संवाद वाढावा यासाठी विशेष प्रयत्न करत एक मोहीम राबवली होती. नागरिकांनी गुन्हेगारीबाबत सतर्क राहून पोलिसांना याबाबतीत माहिती देण्याची अपेक्षा करण्यात येत आहे. मात्र आता नागरिकांनी नाशिकमध्ये जे अवैध धंदे सुरु आहे ते पोलिसांना दिसत नाही का ? असा प्रश्न निर्माण केला आहे.