Nashik City Police | प्रतिबंधित गुटखा पॅकिंग करणाऱ्या टोळीचा नाशिक पोलिसांकडून पर्दाफाश, साडे नऊ लाखांचा मुद्देमाल जप्त (Video)

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन – Nashik City Police | महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेल्या गुटख्याचे पॅकिंग करणाऱ्या टोळीला नाशिक पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी सहा जणांना अटक करुन 9 लाख 43 हजार रुपये किंमतीचा मद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई 16 मार्च रोजी सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास वालदेवी नदीच्या पुलावर विहीतगाव कडे जाणाऱ्या रोडवर करण्यात आली.

रमीन उर्फ अनहर रिवान सैय्यद (वय-30 रा. मन्सुरी चाळ, नाशिक रोड, नाशिक), मोहम्मद अख्तर रना (वय-28 रा. खमदाड चौक, नाशिक), ताबिश इरफान शेख (वय-20 रा. सरदार पटेल रोड, मनमाड, नांदगाव, नाशिक), शोएब इम्तियान पठाण (वय-20 रा. नाशिक), सुरन शिवपुनब राजभर (वय-29 रा. नाशिक), रोहीत संजय वाळुंज (वय-26 रा. भाबड वस्ती, मनमाड) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलीस आयुक्त संदीप कर्णिक (IPS Sandeep Karnik) यांनी महाराष्ट्र राज्यात विक्री, साठा, वितरण, उत्पादन व वाहतुक करण्यासाठी प्रतिबंधित व मानवी सेवनास अपायकारक असलेल्या गुटखा, पानमसाला विक्री करणारे व उत्पादन करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यापार्श्वभूमीवर नाशिरोड पोलीस ठाण्यातील (Nashik Raod Police Station) तपास पथकाकडून शोध घेण्यात येत होता. शनिवारी (दि.16) तपास पथकातील सहायक पोलीस निरीक्षक सुखदेव काळे व पोलीस अंमलदार यांना माहिती मिळाली की, काही व्यक्ती अवैधरित्या गुटखा पॅकिंगचे मशिन व पॅकिंगचे साहित्य तसेच कच्चा माल सुभाष रोड येथून एका महिंद्रा पिकअप गाडीतून घेऊन जात आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार तपास पथकाने गाडीचा शोध घेतला. पोलिसांनी गाडीचा पाठलाग करुन वालदेवी नदीच्या पुलावर विहित गावाकडे जाणाऱ्या रोडवर पिकअप वाहन पकडून सहा जणांना ताब्यात घेतले. गाडीची तपासणी केली असता त्यामध्ये गुटखा पॅकिंगचे मशिन व कच्चा तयार गुटखा तसेच माल पॅकींग करण्याचे विमल पान मसाला नावाचे पॅकेट रोड असे साहित्य मिळाले. पोलिसांनी या कारवाईत 9 लाख 43 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

ही कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त परिमंडळ -2 मोनिता राऊत,
सहायक पोलीस आयुक्त सचिन बारी आणि नाशिकरोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामदास शेळके,
पोलीस निरीक्षक गुन्हे बडेसाब नाईकवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली
सहायक पोलीस निरीक्षक एस.जी. काळे पोलीस अंमलदार विष्णु गोसावी, विजय टेमगर, संध्या कांबळे,
नाना पानसरे, अजय देशमुख, भाऊसाहेब नागरे, मनोहर कोळी, कल्पेश जाधव, सागर आडणे,
दत्तात्रय वाजे, रोहीत शिंदे, प्रमोद ढाकणे, महेंद्र जाधव, गोकुळ कासार, योगेश रानडे यांच्या पथकाने केली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Parkash Ambedkar On Election Commission | महाराष्ट्रात ५ टप्प्यात मतदान कशासाठी? निवडणूक आयोगाने स्पष्टीकरण द्यावं, प्रकाश आंबेडकर यांची मागणी

Baramati Lok Sabha Election 2024 | बारामती लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीची रणनीती उद्या ठरणार, समन्वय समितीची बारामतीत बैठक

Devendra Fadnavis On Uddhav Thackeray | देवेंद्र फडणवीसांची CAA कायद्यावरून उद्धव ठाकरेंवर टीका, ”बाळासाहेब ठाकरे यांचा मुलगा…”

Pune-Baramati-Shirur-Maval Lok Sabha | बारमती मतदारसंघात 7 मे तर पुणे, शिरूर आणि मावळमध्ये 13 मे रोजी होणार मतदान

IAS Rajendra Bhosale | सर्वसामान्य नागरिकांना केंद्रस्थानी ठेवून काम करणार – नवनियुक्त मनपा आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले