रुग्णालयाच्या इमारतीवरुन उडी मारुन मनोरुग्णाची आत्महत्या

नाशिक : पोलीसनामा ऑनलाईन – संदर्भ सेवा रुग्णालयावरुन दोन रुग्णांनी उडी मारून आत्महत्या केल्याचा प्रकार ताजा असतानाच शासकीय जिल्हा रुग्णालयाच्या दुसऱ्या मजल्यावरुन एका मनोरुग्णाने उडी मारुन आत्महत्या केली. ही घटना रविवारी रात्री घडली असून रुग्णाचा उपचारादरम्यान आज (सोमवार) मृत्यू झाला.

सुनील रामराव शिंदे (वय-२७ रा. देवळालीगाव) असे आत्महत्या करणाऱ्या रुग्णाचे नाव आहे. मानसिक स्थिती ठिक नसल्याने त्याच्यावर रुग्णालयाच्या दुसऱ्या मजल्यावरी कक्षामध्ये उपचार सुरु होते. सुनील याची मानसिक स्थिती ठिक नसल्याने त्याला रुग्णालयात दाखल करुन घेण्यात आले होते.

रविवारी संध्याकाळी साडेसातच्या सुमारास सुनील बाथरुममध्ये गेला. तिथे त्याने खिडकीची जाळी काढली. यानंतर तो खिडकीच्यामध्ये आला आणि तेथून उडी मारली. खाली पडल्यामुळे त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्याच्यावर रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरु होते. उपचार सुरु असताना आज सकाळी त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी सरकारवाडा पोलीस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

You might also like