ब्राह्मण मुख्यमंत्री पंचांग बघून मंत्रिमंडळ विस्तार करतील : शिवसेना नेते गुलाबराव पाटील

नाशिक: पोलीसनामा ऑनलाईन 
सध्या इंधन दरवाढीवरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे ब्राम्हण आहेत . पंचांग बघूनच ते मंत्रिमंडळाचा विस्तार करतील असे खळबळजनक वक्तव्य शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांनी केले आहे. ते नाशिक येथे एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलत होते. यावेळी बोलताना राहू कोण ,केतू कोण हे बघूनच मुख्यमंत्री मुहूर्त काढतील अशी  पुस्तीही त्यांनी जोडली.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’9f8425db-bd93-11e8-860f-d744ae582a93′]

यावेळी बोलताना गुलाबराव पाटील म्हणाले, “मुख्यमंत्री महोदय ब्राह्मण आहेत. पंचागाच्या आधारे ते कधी मुहूर्त काढतात, यावर आता मंत्रिमंडळ विस्तार अवलंबून आहे. त्यांना लक्षात येईल राहू कोण, केतू कोण, त्यावर सर्व अवलंबून आहे. मागच्या विस्तारात माझा मंत्रिमंडळात समावेश झाला. आता त्यांच्या पक्षातील, त्यांच्या डोक्यातील कोण आहेत हे पाहावं लागेल” असे ते म्हणाले .

निवडणूक प्रचारातून फेसबुकची माघार

पेट्रोल दरवाढीवरुन निशाणा

यावेळी गुलाबराव पाटील यांनी पेट्रोल दरवाढीवरुनही सरकारवर निशाणा साधला. आधी पेट्रोल पंपावरच्या पोस्टरवर मोदींसोबत वृद्ध स्त्री असायची, आता मॉडेल दिसते असं पाटील म्हणाले. पेट्रोलचे दर गगनाला भिडले तरी लोक भाजपलाच पसंत करतायत अशी हतबलताही त्यांनी व्यक्त केली.