क्राईम स्टोरीनाशिक

Nashik Crime | श्रद्धांजलीसाठी चांगले फोटो ठेवा! Whatsapp Status ठेवून नाशिकमधील तरुणाची आत्महत्या

नाशिक / सिन्नर : पोलीसनामा ऑनलाइन –  सोशल मीडियावर (social media) भावनिक पोस्ट (Emotional post) लिहून एका तरुणाने आत्महत्या (Suicide) केल्याची घटना नाशिक जिल्ह्यातील (Nashik Crime) सिन्नर तालुक्यात घडली आहे. सिन्नर तालुक्यातील ठाणगाव येथील एका 22 वर्षाच्या तरुणाने जग सोडून जात असल्याचं सोशल मीडियावर स्टेटसला ठेवून आत्महत्या केली. या तरुणाने राहत्या घरामध्ये गळफास घेऊन आत्महत्या (Nashik Crime) केली. त्याच्या आत्महत्येचं कारण अद्याप समजू शकले नसून पोलीस तपास करीत आहेत.

 

विशाल उत्तम शिंदे Vishal Uttam Shinde (वय-22 रा. ठाणगाव ता. सिन्नर जि. नाशिक) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.
विशाल शिंदे या तरुणाने शुक्रवारी सोशल मीडियावर आपल्या मित्रांना उद्देशून भावनिक संदेश स्टेटसला ठेवून आत्महत्या (Nashik Crime) केली.
मृत विशालने आपल्या स्टेटसमध्ये मित्रांवर खूप प्रेम असल्याचे म्हटले आहे.
तसेच मी कोणाला दुखावलं असेल तर राग मनावर घेऊ नका, सगळे आनंदाने रहा, असंही त्याने लिहिले आहे.

 

आत्महत्या करण्यापूर्वी विशाने त्याच्या स्टेटसमधून आपल्या मित्रांकडे शेवटची इच्छा व्यक्त केली आहे.
त्याने आपल्या मित्रांना उद्देशून लिहिलं की, माझ्या मृत्यूनंतर भावपूर्ण श्रद्धांजली (Tribute) वाहण्यासाठी सर्वांनी माझे चांगले फोटो तुमच्या स्टेटसला ठेवा.
अशा प्रकारची भावनिक पोस्ट लिहून विशालने टोकाचे पाऊल उचलल्याने सर्वांनाच धक्का (Nashik Crime) बसला आहे.

विशालची पोस्ट पाहून अनेकांनी त्याला समजावून सांगण्यासाठी फोन केला. मात्र तोपर्यंत उशीर झाला होता.
विशालने घरामध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेची माहिती मिळताच ठाणगाव पोलिसांनी (Thangaon police)
घटनास्थळी धाव घेत पंचनामा करुन मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून दिला.
विशालने नेमक्या कोणत्या कारणातून आत्महत्या केली ? हे अद्याप समजू शकले नाही. पोलीस पुढील तपास करीत आहेत.

 

Web Title : Nashik Crime | 22 years old boy commits suicide by putting emotional status on social media in nashik

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

e-filing portal | आता इलेक्ट्रॉनिक पद्धतीने रिटर्न दाखल करण्याच्या पोर्टलवर वार्षिक माहिती विवरण मिळवू शकतात करदाते

RBI Commemorative Coin | 1, 2 नव्हे, 75 आणि 100 ची नाणी सुद्धा जारी करते RBI, तुम्ही अशी मिळवू शकता

Pune Crime | पुण्यातील 54 वर्षीय नराधम चालकाकडून 12 वर्षीय गतीमंद मुलीचे लैंगिक शोषण; 2 वर्षापासून होते घाणेरडे प्रकार 

Back to top button