Nashik Crime | धक्कादायक ! ‘आई, मला माफ कर…’ सुसाईड नोट लिहून 24 वर्षीय नवविवाहितेची आत्महत्या

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन – Nashik Crime | एका 24 वर्षीय नवविवाहितेनं इमारतीच्या टेरेसवरून उडी घेत आत्महत्या (Suicide) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना नाशिक (Nashik Crime) येथील सिडको परिसरात घडली आहे. या घटनेबाबत समजताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळाचा पंचनामा करतेवेळी विवाहितेने आत्महत्येपूर्वी लिहिलेली सुसाईड नोट (Suicide Note) आढळून आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा (FIR) दाखल केला आहे. दरम्यान या घटनेमुळे मात्र परिसरात खळबळ उडाली आहे.

याबाबत माहिती अशी, प्रियांका पगारे (Priyanka Pagare) (वय, 24 रा. सिडको परिसर, खटवडनगर, नाशिक) असं आत्महत्या (Suicide) केलेल्या नवविवाहितेचं नाव आहे. प्रियांका हिने रविवारी (2 जानेवारी) रोजी सकाळी इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून उडी घेत आपली जीवनयात्रा संपवली आहे. आत्महत्येची माहिती कळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यावेळी घटनास्थळी नागरीकांची गर्दी जमली होती. (Nashik Crime)

दरम्यान, घटनास्थळाचा पंचनामा करत असताना पोलिसांना सुसाईड नोट (Suicide Note) सापडली आहे. ‘आई, मला माफ कर, माझ्या आत्महत्येसाठी कुणालाही जबाबदार धरू नये’ असं सुसाईड नोटमध्ये नमूद करण्यात आलं आहे. दरम्यान, मृत प्रियांका यांनी आत्महत्या का केली असावी ? याचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. अंबड पोलिसांनी (Ambad Police Station) आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. याप्रकरणी अधिक तपास पोलिस करीत आहेत.

Web Title : Nashik Crime | 24 years old newly married woman commits suicide by jumping from terrace in nashik

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Pune Crime | लग्नाचे आमिष दाखवून शारिरीक संबंध ठेवून केले 9 महिन्यांची गर्भवती; कोंढव्यातील घटना

Pune Crime | कलयुग ! पोटच्या मुलानं केला आई-बापावर खुनी हल्ला, आई जागीच ठार; इंदापूर तालुक्यातील घटना

TET Exam  Scam | टीईटी पेपर फुटी प्रकरणात नवा खुलासा, आरोपी अश्विनकुमारने 700 विद्यार्थ्यांचे बदलले मार्क, G.A. Software चा संस्थापक गणेशन याचाही सहभाग उघड

LIC Kanyadan Policy | दररोज वाचवा 130 रुपये, 25 वर्षानंतर मिळतील 27 लाख, जाणून घ्या काय आहे प्लान

 फायनान्स कंपनीच्या लोकांकडून महिलेचा विनयभंग, ओढून नेली रिक्षा

 लग्नाचे आमिष दाखवून आईबरोबर शारिरीक संबंध, मुलीशी लग्न लावून देण्यासाठी दिली धमकी