Nashik Crime | नाशिक हादरलं! एकाच कुटुंबातील तिघांची तीन खोल्यांमध्ये आत्महत्या, शहरात खळबळ

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन – Nashik Crime | नाशिकमध्ये एकाच कुटुंबातील तिघांनी आत्महत्या केल्याची (Committed Suicide) धक्कादायक घटना घडली आहे. आत्महत्या करणाऱ्यांमध्ये दोन मुले आणि वडिलांचा समावेश आहे. या तिघांनी वेगवेगळ्या खोलीत गळफास (Hanging) घेऊन जीवन संपवलं. तिघांच्या आत्महत्येचं कारण अद्याप समजू शकलं नाही. घटनेची माहिती (Nashik Crime) मिळताच पोलिसांनी (Nashik Police) घटनास्थळी धाव घेत तपास सुरु केला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
ही घटना रविवारी (दि.29) दुपारी तीन ते साडीतीन च्या दरम्यान घडली. दीपक शिरोडे (वय-55), मोठा मुलगा प्रसाद शिरोडे (वय-25), लहान मुलगा राकेश शिरोडे (वय-23) असे आत्महत्या केलेल्या बाप-लेकांची नावे आहेत. या तिघांनी घरातील वेगवेगळ्या खोलीत गळफास घेत आत्महत्या केली. (Nashik Crime)
दीपक शिरोडे हे अशोक नगर बस स्टॉपजवळ फळ विक्री व्यवसाय करतात.
दरम्यान, पत्नी आणि आई या दुपारी कामानिमित्त बाहेर गेल्या होत्या.
त्या घरी आल्यावर हा प्रकार लक्षात आला. मात्र, आत्महत्येमागचे नेमकं कारण समजू शकले नाही.
घटनास्थळी वरिष्ठ पोलीस अधिकारी दाखल झाले आहेत. पोलिसांकडून तपास सुरु करण्यात आला आहे.
आत्महत्या करणाऱ्या कुटुंबाच्या शेजाऱ्यांकडे पोलीस चौकशी करीत आहेत.
Web Title :- Nashik Crime | 3 members from a family ends life suicide case
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Lingayat Samaj Protest | मुंबईतील लिंगायत समाजाचा मोर्चा स्थगित, 70 ते 80 टक्के मागण्या पूर्ण