Nashik Crime | झाडावरचे आंबे तोडताना विजेचा धक्का लागून सॉफ्टवेअर इंजिनिअरचा मृत्यू

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन – Nashik Crime | झाडावरील आंबे (Mangoes) लोखंडी पाईपने तोडत असताना विजेचा जोरदार शॉक (Electric Shock) बसून सॉफ्टवेअर इंजिनिअरचा (Software Engineer) दुर्दैवी मृत्यू (Death) झाल्याची घटना नाशिकमध्ये (Nashik Crime) घडली आहे. अनिरुद्ध अनिल धुमाळ Aniruddha Anil Dhumal (वय-30) असे मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे. ही घटना इंदिरा नगर येथील राजसारथी सोसायटीमध्ये (Rajsarathi Society) घडली आहे.

आजोबांच्या घरी लोखंडी पाईपने झाडावरचे आंबे काढण्यासाठी शिडीच्या सहाय्याने झाडावर चढत होता. त्यावेळी झाडाजवळून गेलेल्या विजेच्या तारेला (Power Line) पाईपचा स्पर्श झाला. त्यामुळे विजेचा प्रवाह लोखंडी पाईपमध्ये उतरल्याने अनिरुद्ध धुमाळ यांना जोरदार विजेचा धक्का बसला. यामुळे तो झाडावरून खाली फेकला गेला.

झाडावरुन पडल्याने अनिरुद्ध याला गंभीर दुखापत (Serious Injury) झाल्याने त्यास उपचारासाठी तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात (District Government Hospital) दाखल करण्यात आले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून त्याला मृत घोषित केले. दरम्यान अनिरुद्ध याच्या मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. याप्रकरणी इंदिरा नगर पोलीस ठाण्यात (Indira Nagar Police Station) अकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस हवालदार सुंदर कोकाटे (Police Constable Sundar Kokate) करीत आहेत.

Web Title : Nashik Crime | a software engineer died after getting an electric
shock while picking mangoes from a tree in nashik

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Gold Silver Price Today | सोन्या-चांदीच्या दरात वाढ की घसरण? जाणून घ्या आजचे ताजे दर

 

Maharashtra Monsoon Updates | मुंबईत 6 जूनला मान्सूनची एन्ट्री? राज्यात ‘या’ तारखेला वरुणराजाचं आगमन होणार; IMD चा अंदाज

 

Pune Municipal Corporation (PMC) | पावसाळा पूर्व कामांना अद्याप म्हणाविशी गती नाही; आयुक्तांनी तीनही अतिरिक्त आयुक्तांकडे सोपविली जबाबदारी

 

Pune PMC Water Supply | सूस, म्हाळुंगे आणि बावधन बुद्रूक मधील पाणी पुरवठा प्रकल्पाचा आराखडा आठवड्याभरात तयार होणार

लवकरच निविदा प्रक्रिया राबवून कामाला सुरूवात केली जाईल – विक्रम कुमार, महापालिका आयुक्त