Nashik Crime | 5 दिवसांपूर्वी सुट्टीवर आलेल्या जवानाचा अपघाती मृत्यू; दोन जण जखमी

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन – Nashik Crime | चार ते पाच दिवसांपूर्वी सुट्टीवर आलेल्या जावनाचा अपाघाती मृत्यू (Accidental death) झाल्याची घटना नाशिकमध्ये (Nashik Crime) घडली आहे. ही घटना सिन्नर-ठाणगाव रस्त्यावर (Sinnar-Thangaon road) आटकवडे शिवारात शनिवारी (दि.18) रात्री नऊच्या सुमारास घडली. यामध्ये अन्य दोन जण जखमी झाले आहेत. अमोल विलास शिंदे Amol Vilas Shinde (वय-24 रा. ठाणगाव, ता. सिन्नर) असे मृत्यू झालेल्या जवानाचे नाव आहे.

अमोल शिंदे हे चार-पाच दिवसांपूर्वी सुट्टीवर आले होते. वैयक्तिक काम आटोपून दुचाकीवरुन सिन्नर येथून आपल्या मित्रांसोबत ठाणगावकडे निघाले असताना हा अपघात झाला. अपघात नेमका कसा झाला हे समजू शकले नाही. अमोल शिंदे सध्या पश्चिम बंगाल (West Bengal) येथे कर्तव्य बाजावत होते. ते अविवाहित असून त्यांच्या पश्चात आई, वडील, भाऊ, बहीण असा परिवार आहे.

अपघातात अमोल सोबत आणखी दोन जण किरकोळ जखमी झाले असून त्यांच्यावर सिन्नर येथे उपचार सुरु आहेत.
अपघातात मृत्यू पडलेल्या सैन्य दलातील जवानाचे (army soldier) शवविच्छेदन सिन्नर येथील ग्रामीण रुग्णालयात (Sinnar Rural Hospital) करण्यात आले. जवान अमोल शिंदे याचा अपघाती मृत्यू झाल्याचे समजताच गाववार शोककळा पसरली आहे.

हे देखील वाचा

Pitru Paksha 2021 | उद्यापासून श्राद्धपक्ष सुरू होईल, 16 दिवसापर्यंत चुकूनही करू नका ‘ही’ कामे; जाणून घ्या

Punjab New CM | …म्हणून अंबिका सोनींनी नाकारली सोनिया गांधींकडून आलेली पंजाबच्या मुख्यमंत्रीपदाची ‘ऑफर’

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : Nashik Crime | accidental death jawan amol vilas shinde nashik

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update