Nashik Crime | नाशिक मनपाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. सुवर्णा वाझे-जाधव यांचा मृतदेह जळालेल्या अवस्थेत आढळल्याने प्रचंड खळबळ

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन – Nashik Crime | प्रजासत्ताक दिनी (Republic Day) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. नाशिक (Nashik Crime) मध्ये महापालिकेच्या महिला वैद्यकीय अधिकाऱ्याचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. डॉ. सुवर्णा वाझे-जाधव (Dr. Suvarna Waze-Jadhav) असे या महिला डॉक्टरचे नाव आहे. घटनेची माहिती मिळताच वाडीवर्हे पोलीस ठाण्यातील (Wadivarhe Police Station) अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. डॉ. सुवर्णा यांचा मृतदेह एका गाडीमध्ये जळालेल्या अवस्थेत आढळून आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

 

महापालिकेच्या महिला वैद्यकीय अधिकाऱ्याचा (Municipal Women’s Medical Officer) मृतदेह (Dead Body) जळालेल्या अवस्थेत आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. नाशिकच्या वाडीवर्हे परिसरात एका वाहनात हा मृतदेह आढळून आला आहे. तर ज्या वाहनात हा मृतदेह आढळून आला आहे ते वाहन देखील पूर्णपणे आगीत जळून खाक झाले आहे. वाझे या महापालिकेच्या आरोग्य विभागातील कंत्राटी वैद्यकीय अधिकारी या पदावर कार्यरत होत्या. (Nashik Crime)

 

कालच सुवर्णा वाझे-जाधव यांच्या पतीने अंबड पोलिसांत (Ambad Police Station) मिसिंगची पोलिसांत तक्रार दिली होती.
तर घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि मनपा अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून नेमकी ही दुर्घटना आहे की घातपात त्या दृष्टीने तपास सुरू आहे, मात्र एका वैद्यकीय अधिकाऱ्याचा मृतदेह अश्या अवस्थेत आढळल्याने शहर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

 

Web Title :- Nashik Crime | death body found of nashik municipal corporation female medical officer Dr. Suvarna Waze Jadhav in Wadivarhe Police Station area of nashik

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा