Nashik Crime | नाशिकमध्ये बंद गाळ्यात आढळले मानवी शरीराचे अवयव

नाशिक: पोलीसनामा ऑनलाइन – Nashik Crime | नाशिक येथील मुंबई नाका पोलीस ठाण्यामागे (Mumbai Naka Police Station) असलेल्या हरि विहार सोसायटीतील (Hari Vihar Society) गाळ्यामध्ये मानवी शरीराचे (Human Organs)आठ कान (Ears), मेंदू (Brain), डोळे (Eyes) हे अवयव सापडल्याने नाशिकमध्ये (Nashik Crime) खळबळ उडाली आहे. स्थानिकांनी पोलिसांना याबाबत माहिती दिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. दरम्यान, गाळ्यात ज्या पद्धतीने अवयवाचे जतन करून ठेवले आहे ती पद्धत वैद्यकीय क्षेत्राशी (Medical Field) निगडित असल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.

 

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, हरिविहार सोसायटीतील 20 आणि 21 क्रमांकाचे गाळे (Shop) अनेक वर्षांपासून बंद होते. त्यापैकी एका गाळ्यातून गेल्या दोन दिवसांपासून दुर्गंधी येत होती. स्थानिक या दुर्गंधीमुळे वैतागले होते. त्यांनी याचा शोध घेतला असता या गाळयातून दुर्गंधी येत असल्याचे लक्षात आले. नागरिकांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली. पोलिसांचा फौजफाटा तात्काळ घटनास्थळी दाखल झाला. उपायुक्त पौर्णिमा चौगुले (DCP Pournima Chowgule), सहायक आयुक्त दीपाली खन्ना (ACP Deepali Khanna), गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अंचल मुदगल (Crime Branch Senior Police Inspector Anchal Mudgal), आनंदा वाघ, सुनील रोहकले यांसह न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळेचा चमू (फॉरेन्सिक-Forensic) घटनास्थळी काही वेळेत पोहोचले. (Nashik Crime)

 

संबंधित गाळ्याचा पत्रा एका बाजूने गंजला होता. पोलिसांनी गाळा उघडला त्यावेळी सर्व भंगार माल साठवून ठेवल्याचे आढळले. यामध्ये लाकडी साहित्य तसेच लोखंडी वस्तू देखील होत्या. त्याचबरोबर पोलिसांना तेथे प्लास्टिकचे दोन डबे आढळले. ते डबे वैद्यकीय क्षेत्राशी निगडित असल्याचा पोलिसांना संशय आला. त्यांनी ज्यावेळी हे डबे उघडले असता दुर्गंधीचा एकच लोट पसरला. पोलिसांनी नाकातोंडाला मास्क लावून बॅटरीच्या साहाय्याने पाहणी केली असता द्रव रसायनामध्ये (Liquid Chemistry) मानवी अवयव जतन करून ठेवण्यात आल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले. फॉरेन्सिक चमूने हे दोन्ही डबे ताब्यात घेतले. पोलिसांनी गाळामालक महिला शुभांगिनी शिंदे (Shubhangini Shinde) यांना बोलाविले. तसेच त्यांच्या दोन्ही मुलांना जे डॉक्टर आहेत, त्यांनाही पोलिसांनी या ठिकाणी बोलावून माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला.

वैद्यकीय अभ्यासाकरिता अवयव ठेवल्याचा संशय
शिंदे कुटुंबियांचा एक मुलगा दंतचिकित्सक (Dentist) तर दुसरा कान, नाक, घसा  तज्ज्ञ आहे. त्यांनी काही वर्षांपूर्वी या गाळ्यात मानवी अवयव वैद्यकशास्त्राच्या अभ्यासासाठी आणले असावे, असा पोलिसांना प्रथमदर्शनी संशय आहे. मात्र या डॉक्टरबंधूंनी पोलिसांना अद्यापपर्यंत कोणतीही ठोस अशी माहिती दिली नाही. हा गाळा कोणाला भाड्याने दिला होता का? हे देखील त्यांना सांगता न आल्याने त्यांना चौकशीसाठी (Inquiry) ताब्यात घेतले असल्याचे पोलिसांनी सांगितले.

 

पोलीस उपायुक्त पौर्णिमा चौगुले म्हणल्या की, वैद्यक शास्त्राच्या निगडित असलेल्या पद्धतीनुसार मानवी अवयवांचे जतन करून ठेवण्यात आले होते.
अवयवांची कापनी देखील अत्यंत शार्प असून आठ कान डब्यातून मिळालेले आहेत. तसेच मेंदूसदृश काही अवयवही आढळले आहेत.
ज्यांचा हा गाळा आहे त्या डॉक्टर बंधूंकडे चौकशी सुरू आहे.
मागील इतक्या वर्षांपासून गाळ्यात अवयव कोठून आले याचा तपास सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

 

 

Web Title :- Nashik Crime | human organs found in nashik police starts investigation

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Allu Arjun Viral News | सुप्रसिद्ध दक्षिणात्य अभिनेता अल्लू अर्जुनवर झाली पोलिसांकडून मोठी कारवाई, गाडीमध्ये सापडली..

 

Post Office MIS Account | दरमहा कमाई पाहिजे तर ‘या’ खात्यात 1 हजार जमा करा

 

Not Receiving Aadhaar OTP | आधार कार्ड मोबाईल क्रमांकसोबत लिंक करुनही OTP येत नाही? मग ‘हे’ करा काम, जाणून घ्या