Nashik Crime | मनमाडमध्ये हात कापून 9 वर्षांच्या बालकाची हत्या; प्रचंड खळबळ

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन – मनमाड शहरात नऊ वर्षांच्या बालकाची करवतीने हात कापून हत्या (Nashik Crime) केल्याचा प्रकार उघड झाला आहे. यामुळे शहरासह जिल्हा हादरला आहे. बुधवारपासून हा बालक बेपत्ता होता. रेल्वे रुळावर त्याचा मृतदेह सापडला आणि हा प्रकार उघडकीस आला आहे. पोलिसांनी (Nashik Crime) या प्रकरणी एका संशयितास ताब्यात घेतले आहे.

शहरातील नेहरू भवन परिसरात राहणारा लोकेश सोनवणे (वय – 9) हा बुधवारी सकाळपासून बेपत्ता होता. त्याच्या पालकांनी त्याचा सर्व ठिकाणी शोध घेतला. पण, त्याचा तपास लागला नाही. अखेर पालकांनी पोलीस ठाण्यात मुलगा बेपत्ता असल्याची फिर्याद दिल्यानंतर पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला. गुरुवारी एका बालकाचा मृतदेह रेल्वे स्थानकापासून काही अंतरावर झुडपात नागरिकांना दिसला. याची माहिती पोलिसांना देण्यात आली. सहायक पोलीस निरीक्षक प्रल्हाद गिते, रेल्वे पोलीस निरीक्षक जोगदंड यांच्यासह आरपीएफ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली असता, मृतदेह बेपत्ता लोकशचा असल्याचे निष्पन्न झाले.

त्याचा एक हात कापलेला पाहून पोलिसांनाही धक्का बसला. तसेच त्याच्या मृतदेहाजवळील एक करवतही
पोलिसांनी हस्तगत केली. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालयात
पाठविला आहे. या घटनेची माहिती कळताच घटनास्थळी बघ्यांची गर्दी झाली होती.
आपला चिमुकला गमावल्याने सोनवणे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
पोलिसांनी नेहरूनगर येथील सीसीटीव्ही तपासले असता, एक तरुण करवत घेऊन जात असल्याचे
पोलिसांना आढळले. पोलिसांनी त्याला अटक केली असून, त्याचा कसून तपास सुरू आहे.

Web Title :- Nashik Crime | killing of a child by cutting his hand with a saw nashik crime news

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Sidhu MooseWala Murder Case | सिद्धू मुसेवालाच्या हत्येचा मास्टरमाइंड गोल्डी ब्रार कॅलिफोर्नियात

Pune ACB Trap | दीड लाखांची लाच घेताना शिवाजीनगर कोर्टातील वरिष्ठ लिपिक अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात