Nashik Crime | नाशिकच्या ‘सोनाली मटण-भाकरी’ हॉटेलमध्ये 25 वर्षीय तरुणाचा खून

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन – Nashik Crime | एका हॉटेलमध्ये जेवणावरुन झालेल्या वादातून तीन ते चार जणांनी एका तरुणाच्या डोक्यात फरशीच्या तुकड्याने वार करुन त्याचा खुन केल्याचा प्रकार घडला. प्रसाद भालेराव (वय २५, रा. उपनगर परिसर, नाशिक रोड) असे खुन झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी अंबड पोलिसांनी रात्री दोघांना ताब्यात घेतले आहे. ही घटना सिडकोमधील स्टेट बँकेजवळील सोनाली मटण भाकरी हॉटेलमध्ये रात्री पावणे दहा वाजण्याच्या सुमारास घडली.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नाशिकमध्ये रात्री लॉकडाऊन असतानाही अनेक ठिकाणी हॉटेल उशिरापर्यंत उघडी असतात. प्रसाद भालेराव आणि काही जण तेथे जेवायला आले होते. जेवणावरुन त्याचे व इतर तीन ते चार जणांशी वाद झाला. त्यातून त्यांच्यात भांडणे झाली. तेव्हा हल्लेखोरांनी प्रसाद याच्यावर फरशीच्या तुकड्यांनी हल्ला केला.

फरशीचा तुकड्याचे घाव त्याच्या वर्मी लागल्याने जागेवर प्रसाद कोसळला. त्यानंतर हल्लेखोर पळून गेले. प्रसादला उपचारार्थ शासकीय रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्याचा मृत्यु झाल्याचे घोषित केले. या घटनेची माहिती मिळाल्यावर वरिष्ठ पोलीस निरीक्षक कुमार चौधरी,
सहायक पोलीस निरीक्षक गणेश शिंदे यांच्यासह पोलीस अधिकारी,
कर्मचार्‍यांनी घटनास्थळी धाव घेतली.
मारहाण करणार्‍यांपैकी दोघांना पोलिसांनी रात्री उशिरा ताब्यात घेतले आहे.

Web Title : Nashik Crime | murder n of 25 years old youth in sonali mutton bhakri hotel

हे देखील वाचा

Tokyo Olympics 2020 | मीराबाईच्या ‘चांदी’च्या झळाळीचे रेल्वे मंत्र्यांनी केले कौतूक,
2 कोटी रुपयांसह प्रमोशन देण्याची घोषणा (Video)

Pune News | ‘डॉ. कलाम यंग रिसर्च फेलोशिप’चे डॉ.अरुण फिरोदिया यांच्या उपस्थितीत वितरण;
7 युवा संशोधकांचा गौरव ग्रामीण भारताच्या प्रगतीसाठी संशोधने व्हावीत : डॉ अरुण फिरोदिया

Facebook | फेसबुकवरील एका चुकीच्या टॅगमूळे पतीची ‘पोलखोल’, पत्नीला समजलं ‘गुपित’ आणि घटस्फोटाचे ‘खरे’ कारण