नाशिक : पोलीसनामा ऑनलाईन – जुन्या वादातून टोळक्याने २७ वर्षीय तरूणाची घरात घुसून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रवीण कांडाळकर (वय-२७) असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. सिन्नरच्या वावी पोलिस स्टेशनच्या हद्दीत ही घटना घडली. या घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
अधिक माहितीनुसार, प्रवीण कांडळकर हा त्याच्या घरी असताना जुन्या वादातून टोळक्याने घराचे दरवाजे तोडून कोयता, कुऱ्हाड, तलवार आणि चॉपरने हल्ला केला. या हल्ल्यामध्ये प्रवीणचा मृत्यू झाला. प्रवीण रक्ताच्या थारोळ्यात पडल्यानंतर हल्लेखोर पसार झाले होते. घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पूर्व वैमन्यस्यातून ही हत्या झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
या टोळक्याकडून आपल्या जीवाला धोका असल्याची जाणीव होती म्हणून प्रविणने अगोदरच हत्या करणाऱ्या टोळक्याच्या विरोधात वावी पोलिसांमध्ये तक्रार दिली होती. मात्र पोलिसांनी तक्रारीला गांभीर्याने न घेतल्याने ही हत्या झाली, असा आरोप मयत तरुणाच्या कुटुंबीयांनी केला आहे.