Nashik Crime News | नाशिकमध्ये तोल जाऊन गिर्यारोहकाचा दरीत कोसळून दुर्दैवी मृत्यू

नाशिक : पोलीसनामा ऑनलाईन – Nashik Crime News | नाशिकमध्ये छोट्याशा चुकीमुळे एका गिर्यारोहकाला (Mountaineer) आपला जीव गमवावा लागला आहे. कल्याण-नगर रस्त्यावरील माळशेज घाट (Malshej Ghat) परिसरात हि घटना घडली आहे. हा गिर्यारोहक ट्रेकिंगसाठी (Trekking) गेला असताना त्याचा तोल जाऊन हा अपघात झाला आहे. किरण काळे (50, रा. टाकळी रोड, नाशिक) असे मृत पावलेल्या गिर्यारोहकाचे नाव आहे. नाणेघाट भागात चोरदरीत रविवारी दुपारी बाराच्या सुमारास हि घटना घडली आहे. किरण काळे यांच्या माघारी पत्नी, मुलगा व मुलगी असा परिवार आहे. तसेच यावेळी त्यांच्यासोबत असलेले इतर गिर्यारोहक सुखरूप असल्याची माहिती स्थानिक प्रशासनाकडून देण्यात आली आहे. (Nashik Crime News)
प्रसिद्ध गिर्यारोहक आणि एलआयसीचे अधिकारी (डीओ) म्हणून किरण काळे यांची जिल्ह्यात ओळख आहे. त्यांनी आतापर्यंत आपल्या कारकिर्दीत अनेक अवघड चढाया पार पाडल्या आहेत. यावेळी नेहमीच्या सवयीप्रमाणे त्यांच्यासह नाशिकमधील बारा गिर्यारोहकांचा एक गट ट्रेकिंगसाठी रविवारी सकाळी माळशेज घाटात गेला होता. यावेळी दुपारच्या सुमारास घाटमाथ्याकडे जात असताना, चोरदरी या खडतर वाटेवर पाच जण दरीत अडकले. यादरम्यान किरण काळे यांचा तोल गेला आणि ते दरीत कोसळले आणि त्यांचा मृत्यू झाला. (Nashik Crime News)
या अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलिस, महसूल, वन आणि स्वयंसेवी संस्थांनी त्या ठिकाणी तातडीने
धाव घेतली. या ठिकाणी ट्रेकिंगला गेलेल्या 12 जणांपैकी 11 जण सुखरूप आहेत अशी माहिती मुरबाडचे
तहसीलदार संदीप आवारी यांनी दिली आहे. या दुर्दैवी घटनेमुळे नाशिक जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.
यावेळी रात्री उशिरापर्यंत स्थानिक पोलिस व प्रशासनाचा तपास व इतर कार्यवाही करण्यात येत होती.
Web Title : Nashik Crime News | a trekker from nashik who went for trekking in the malshej ghat area on the kalyan nagar road fell into the valley and died
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
हे देखील वाचा
Jalgaon Crime News | अवैध वाळू वाहतुकीच्या वादातून एकाची धारधार शस्त्राने हत्या