Nashik Crime News | नाशिकमध्ये हल्लेखोरांकडून कंपनीच्या मॅनेजरवर प्राणघातक हल्ला, वार करून खून

नाशिक : पोलीसनामा ऑनलाईन – नाशिक (Nashik Crime News) मध्ये एक थरारक घटना घडली आहे. यामध्ये काही अज्ञात गुंडांनी कंपनीतून घराकडे जाणाऱ्या कंपनी मॅनेजरवर धारदार हत्यारांनी वार करून खून केल्याची घटना घडली आहे. योगेश मोगरे असे कंपनी मॅनेजरचे नाव आहे. ही घटना पाथर्डी फाटा येथील फाळके स्मारकाजवळ हॉटेल अंगण समोर घडली आहे. याप्रकरणी इंदिरानगर पोलिसांनी (Indiranagar Police) अज्ञात मारेकऱ्यांविरोधात गुन्हा (FIR) दाखल केला आहे. (Nashik Crime News)

या घटनेत गंभीर जखमी झालेले योगेश मोगरे (Yogesh Mogre) यांच्यावर नाशिक अमरधाम येथे दुपारी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेनंतर परिसरात एकच हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. त्याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, योगेश मोगरे हा अंबड औद्योगिक वसाहतीत मॅनेजर म्हणून काम करत होता.
गुरुवारी रात्री साडेआठच्या सुमारास तो कंपनीतून घरी जाण्यासाठी आपल्या चार चाकी गाडीतून निघाला.
यावेळी पाथर्डी फाटा येथील फाळके स्मारकाजवळ हॉटेल अंगण समोर काही अज्ञात व्यक्तींनी त्याची कार अडवून
त्याच्यावर प्राणघातक हल्ला केला आणि आणि योगेश याची कार घेऊन फरार झाले. (Nashik Crime News)

संपूर्ण घटनेची माहिती मिळताच तत्काळ पोलीस उपायुक्त खांडवी, इंदिरानगर पोलीस ठाण्याचे
वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय बांबळे सह पोलीस अधिकारी (Sr PI Sanjay Bamble) व कर्मचारी
घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी तातडीने जखमी योगेश मोगरे याला खाजगी रुग्णालयात दाखल केले.
मात्र उपचारादरम्यान आज सकाळी योगेशचे निधन झाले. या घटनेनंतर इंदिरानगर पोलिसांनी अज्ञात मारेकऱ्यांविरोधात खूनाचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांकडून या आरोपींचा कसून शोध सुरु आहे.
योगेश यांच्या पश्चात आई, पत्नी, मुलगी व भाऊ असा परिवार आहे.

Web Title :- Nashik Crime News | death of a company manager in a deadly attack

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

NCP Chief Sharad Pawar | शरद पवारांना कधी ‘फ्रेंच कट’ दाढीत पाहिलं का?, सुप्रिया सुळेंनी शेअर केला दुर्मिळ फोटो

Ajit Pawar On Shinde Fadnavis Govt | विकासाच्या ऐवजी राज्यातल्या गुन्ह्यांचा वेग डबल; सत्ता टिकविण्यासाठी डबल इंजिन सरकारची तडजोड सुरु – अजित पवार