Nashik Crime News | नाशिकमध्ये एकाच दिवशी इंजिनिअर तरुण-तरुणीची आत्महत्या; कारण अद्याप अस्पष्ट

नाशिक : पोलीसनामा ऑनलाईन – Nashik Crime News | नाशिकमध्ये एकाच दिवशी अभियांत्रिकीचे शिक्षण घेणाऱ्या तरुण- तरुणीने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. नाशिक शहरातील आडगाव परिसरात या घटना घडल्या आहेत. यामुळे संपूर्ण जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. या दोघांनी नेमकी कोणत्या कारणामुळे आत्महत्या केली हे अद्याप समजू शकलेले नाही. (Nashik Crime News)

 

पहिल्या घटनेत नाशिक शहरातील आडगाव शिवारातील एका अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या 20 वर्षाच्या विद्यार्थिनीने म्हाडाच्या स्वप्नपूर्ती सोसायटीतील राहत्या खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. कल्याणी राजाराम थापाळे असे आत्महत्या करणाऱ्या तरुणीचे नाव आहे. कल्याणी हि आडगाव शिवारात असलेल्या स्वप्नपूर्ती हाडा इमारती राहत असून ती त्याच परिसरात असलेल्या एका अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षण घेत होती. तिने अचानक आत्महत्या करण्याचे पाऊल का उचलले हे मात्र अद्याप समजू शकलेले नाही. (Nashik Crime News)

 

तर दुसऱ्या एका घटनेत एका इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरने चौदा मजली इमारतीच्या टेरेसवरुन उडी मारुन आत्महत्या केली आहे.
हि घटना नाशिकच्या आडगाव शिवारातील वृंदावननगर या ठिकाणी घडली आहे.
साहिल बापूराव पवार असे आत्महत्या करणाऱ्या इंजिनिअर तरुणाचे नाव आहे.
त्याच्या डोक्याला मार लागल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र त्यागोदरच त्याचा मृत्यू झाला होता.
या प्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
साहिलने नेमकी कोणत्या कारणामुळे आत्महत्या केली याचा तपास पोलीस करत आहेत.

 

Web Title :- Nashik Crime News | engineer youth committed suicide in adgaon shiwar in nashik

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Attack On Sandeep Deshpande | देशपांडेवरील हल्ल्याप्रकरणी आदित्य ठाकरे, संजय राऊतांची चौकशी करा, मनसे नेत्याची पोलिसांकडे मागणी; राजकीय वर्तुळात खळबळ

MNS Sandeep Deshpande | मनसे नेते संदीप देशपांडे यांच्यावर शिवाजी पार्कमध्ये हल्ला; रॉड आणि स्टम्पने केली मारहाण

Pune Crime News | ‘चोरटे’ही ‘रंगले’ कसबा निवडणुकीच्या रणधुमाळीत; जबरी चोरी, घरफोडी, वाहनचोरीच्या गुन्ह्यात घट