नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन – Nashik Crime News | पतीचे असलेले अनैतिक संबंध (Immoral Relationship) आणि त्याच्याकडून होत असलेल्या जाचाला कंटाळून महिलेने विषारी औषध सेवन केले. यात महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू (Death) झाला आहे. याप्रकरणी महिलेच्या माहेरच्यांनी दिलेल्या तक्रारीवरुन पती, सासू आणि पतीची गर्लफ्रेण्ड (Girlfriend) यांच्यावर अंबड पोलीस ठाण्यात (Ambad Police Station) गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे नाशिक शहरातील सिडको परिसरात खळबळ उडाली आहे. अनिता पंकज गोठे Anita Pankaj Gothe (वय-29) असे आत्महत्या (Suicide) करणाऱ्या महिलेचे नाव आहे. (Nashik Crime News)
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, अनिता गोठे यांच्या पतीचे अनैतिक संबंध होते. त्याने मयत अनिता यांना वारंवार मारहाण (Beating) करुन धमकी दिली. माहेरच्यांकडून घर खर्चासाठी पैसे आणण्यासाठी अनिताकडे तगादा लावला होता. पतीकडून सतत होत असलेल्या शारीरिक व मानसिक छळाला कंटाळून पत्नीने राहत्या घरात उंदीर मारण्याचे विषारी औषधाचे सेवन केले.
अतिना गोठे यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. अनिताच्या मृत्यूला पती पंकज एकनाथ गोठे (Pankaj Eknath Gothe), सासू बेबी एकनाथ गोठे (रा. विशाल पार्क, माऊली लॉन्स, डीजीपी नगर) तसेच पंकजची प्रेयसी यांच्या विरोधात अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Nashik Crime News)
दरम्यान, आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात यावा यासाठी
अनिताच्या माहेरच्यांनी अंबड पोलीस ठाण्यात गुरुवारी ठिय्या दिला होता.
अनिता गोठे यांचा भाऊ नितीन सीताराम निर्भवणे याने अंबड पोलीस ठाण्यात याबाबत फिर्याद दिली आहे.
अनिता यांना 2014 पासून ते 2023 पर्यंत सतत त्रास दिला जात होता, असे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
पोलिसांनी तिघांवर गुन्हा दाखल केला असून पुढील तपास अंबड पोलीस करीत आहेत.
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
हे देखील वाचा
Pune Crime News | पत्नीला मारहण करणाऱ्या पतीला न्यायालचा दणका, घरात प्रवेश बंदी