Nashik Crime News | भावाला नोकरीला लावून देण्याच्या बहाण्याने आरोपींकडून महिलेला 20 लाखांचा गंडा

नाशिक : पोलीसनामा ऑनलाईन – Nashik Crime News | राज्यात फसवणुकीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहेत. हे आरोपी गोड बोलून सहज एखाद्याला आपल्या जाळ्यात अडकवतात. नाशिकमधील एक महिला आरोपींच्या याच भूलथापांना बळी पडली. या आरोपींनी पीडित महिलेला 20 लाखांचा गंडा घातला आहे. याबाबत एका महिलेने फिर्यादी दिली आहे. नंदकिशोर काशीनाथ गरकळ, सुमित नंदकिशोर गरकळ व हृषिकेश गरकळ (तिघे रा. नायगाव, ता. सिन्नर) अशी आरोपींची नावे आहेत. (Nashik Crime News)

फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 24 नोव्हेंबर 2017 ते 20 मार्च 2020 या कालावधीत संशयितांनी त्यांना 20 लाखांचा गंडा घातला. फिर्यादी यांच्या भावास नोकरी लावून देतो, असे सांगून फिर्यादी व त्यांच्या आईकडून आरोपींनी धनादेश, ऑनलाइन पद्धतीने 20 लाख 36 हजार 838 रुपये घेतले. मात्र त्यांनी भावाला काही नोकरी लावून दिली नाही. (Nashik Crime News)

त्यामुळे आपली फसवणूक झाली असल्याचे समजल्यावर फिर्यादी व त्यांच्या आईने नाशिकरोड पोलिस ठाण्यात
आरोपीविरोधात तक्रार दाखल केली. नाशिकरोड पोलिस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

Web Title :- Nashik Crime News | nashik the three together cheated a woman of 20 lakhs

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Raigad Crime News | पोलादपूरमध्ये 55 वर्षीय व्यक्तीची नैराश्याच्या भरात आत्महत्या

Pune Crime News | एक्स्ट्रा चार्जेस कमी करुन घेणे पडले महागात; टीम व्हिव्हर अ‍ॅप डाऊनलोड करायला सांगून केली फसवणूक

Maharashtra Budget Session 2023 | शिवसेनेनं बजावला 55 आमदारांना व्हीप, भास्कर जाधवांचे टीकास्त्र म्हणाले- ‘अशा व्हीपला आम्ही भीक घालत नाही’