Nashik Crime News | 21 वर्षांनी गर्भवती राहणाऱ्या महिलेचा दुर्दैवी मृत्यू; नाशिकमधील घटना

नाशिक : पोलीसनामा ऑनलाईन – Nashik Crime News | नाशिकमध्ये एक मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. यामध्ये घरात भोवळ येऊन पडल्याने गर्भवतीसह जुळ्या बाळांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. हि महिला तब्बल 21 वर्षांनी गर्भवती राहिली होती त्यामुळे घरात आनंदाचे वातावरण होते. मात्र या परिवाराचा आनंद काही जास्त वेळ टिकू शकला नाही. पाथर्डी फाटा येथील या हृदयद्रावक घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. (Nashik Crime News)

काय आहे संपूर्ण प्रकरण?

पूजा देवेंद्र मोराणकर असे मृत्युमुखी पडलेल्या गर्भवती महिलेचे नाव आहे. पाथर्डी फाटा परिसरात मोराणकर कुटुंब राहत असून, शुक्रवारी सकाळी पूजा आपल्या घरातील कामे करीत होत्या. घरातील कामे आवरण्यासाठी त्या बाथरूममध्ये गेल्या. बाथरूममधून बाहेर आल्यानंतर त्यांना अचानक भोवळ आली आणि घरातच कोसळल्या. या वेळी घरामध्ये वडील रमेश चिंतामण पाखले आणि बहीण होती. (Nashik Crime News)

पूजा जमिनीवर कोसळल्याचे पाहून वडिलांनी आणि बहिणीने पूजा यांना तातडीने पाथर्डी फाटा येथील
वक्रतुंड रुग्णालयात पूजा यांना दाखल करण्यासाठी गेले.
मात्र, जिना चढत असतानाच त्यांना पुन्हा भोवळ आली आणि त्या जागीच कोसळल्या.
यावेळी पूजा यांच्यासह त्यांच्या गर्भातील जुळ्या बाळांचा मृत्यू झाला.
या घटनेमुळे मोराणकर आणि पाखले कुटुंबीयावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या प्रकरणी इंदिरानगर पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

Web Title :- Nashik Crime News | pregnant woman death with twins in nashik

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Kolhapur Crime News | सतत होत असलेल्या भांडणाला वैतागून आरोपी मुलाचा आपल्या आईवडिलांवर प्राणघातक हल्ला; कोल्हापूरमधील घटना

Mumbai Accident News | चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्यामुळे भीषण अपघात; दोघांचा जागीच मृत्यू

Jalgaon Crime News | दुर्दैवी ! पुतणीच्या हळदीचा कार्यक्रम आटोपून नातेवाईकांकडे जात असताना काकांचा अपघातात मृत्यू

Jalna Crime News | मळणी यंत्रामध्ये महिलेची वेणी अडकल्यामुळे महिलेचा दुर्दैवी मृत्यू

Pune Crime News | सोलर पंपाचे अनुदान मिळवून देण्याच्या आमिष दाखवून तिघांची फसवणूक; इंदापूर पोलीस ठाण्यात स्वप्नील बंडगर व विजय बंडगर यांच्यावर FIR

Pune Crime News | व्याजाने दिलेल्या पैशांची ‘पठाणी’ वसुली करणार्‍या तिघा सावकारांविरूध्द गुन्हा; रविंद्र कांबळेला अटक तर आकाश कासट व जमीर कदम वर FIR