Nashik Crime News | लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार करणाऱ्यास सात वर्ष सक्तमजुरी; नाशिक न्यायालयाचा निर्णय

नाशिक : पोलीसनामा ऑनलाईन – Nashik Crime News | नाशिकमध्ये एका केसवर निर्णय देताना कोर्टाने लग्न करण्याचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला सात वर्षे सक्तमजुरी व तीन हजार रुपयांचा दंड, अशी शिक्षा सुनावली आहे. रवीश प्रभाकर दुरगुडे (35, रा. गावदेवी रोड, घाटकोपर, मुंबई) असे आरोपी व्यक्तीचे नाव आहे. ऑक्टोबर ते नोव्हेंबर 2018 या कालावधीत रवीशने आपल्या अत्याचार केल्याची तक्रार पीडित तरुणीने केली होती. (Nashik Crime News)

रवीश हा विवाहित असतानाही त्याने अविवाहित असल्याचे भासवून पीडितेशी संपर्क साधला. तिच्यासोबत खोटे बोलून लग्न करण्याचे आमिष दाखवून रवीशने दीपालीनगर परिसरात पीडितेवर अत्याचार केला. आरोपीने आपल्याला फसवले असल्याचे लक्षात आल्यानंतर पीडितेने मुंबईनाका पोलिस ठाण्यात बलात्कार, फसवणुकीची तक्रार दाखल केली. (Nashik Crime News)

यानंतर पोलिसांनी पीडितेची तक्रार दाखल करून आरोपीविरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. तत्कालीन पोलिस निरीक्षक पी. यु. शिंदे यांनी तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.
या प्रकरणी सरकारी पक्षातर्फे एस. एस. गोरे यांनी युक्तिवाद केला.
यानंतर कोर्टाने साक्षीदार व परिस्थितीजन्य पुराव्यांच्या आधारे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. एस. खरात
यांनी रवीशला सात वर्षे सक्तमजुरी व तीन हजार रुपयांचा दंड, अशी शिक्षा सुनावली आहे.
या खटल्यात पैरवी अधिकारी म्हणून महिला पोलिस कर्मचारी एस. सी. भोये यांच्यासह न्यायालयीन अंमलदार पी. व्ही. पाटील यांनी कामकाज पाहिले.

Web Title :-  Nashik Crime News | Seven years of hard labor for raping by luring marriage; Judgment of Nashik Court

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Koregaon Crime News | सोने घडवण्याच्या बहाण्याने ३१ लाखांचा ऐवज घेऊन कारागीर फरार; कोरेगाव पोलिसात गुन्हा दाखल

Pune Pimpri Chinchwad Crime | महिलेचा विनयभंग करत वडिलांना मारहाण, आरोपीला अटक; चाकण परिसरातील घटना

MC Stan | रॅपर एमसी स्टॅन बॉलिवूड मध्ये येण्यासाठी सज्ज; साजिद-वाजिदकडून मिळाली ‘ही’ खास ऑफर