Nashik Crime News | 10 वीच्या परीक्षेदरम्यान सुपरवायझिंगला आलेल्या सरांचे हृदयविकाराच्या झटक्यानं निधन

नाशिक : पोलीसनामा ऑनलाईन – Nashik Crime News | सध्या राज्यात 10 वी आणि 12 वीच्या परीक्षेची लगबग सुरु आहे. यामुळे शिक्षकांवर मोठा ताण आहे. नाशिक जिल्ह्यातील सिन्नर शहरात परीक्षा केंद्रावर एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये पेपर सुरू होण्यापूर्वी पर्यवेक्षण करणाऱ्या शिक्षकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. (Nashik Crime News)

काय घडले नेमके?
6 मार्च रोजी इंग्रजीचा पेपर होता. त्यामुळे सिन्नर येथील महात्मा फुले विद्यालयात पेपरची लगबग सुरु होती. ते विद्यालयात पर्यवेक्षणासाठी त्याठिकाणी हजर होते. नियोजन सुरू असताना अचानक पर्यवेक्षकांना चक्कर येऊन खाली कोसळले. यानंतर त्यांना बाकी शिक्षकांनी तातडीने शहरातील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र त्या ठिकाणी डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. किरण भास्करराव गवळी असे मृत शिक्षकाचे नाव आहे. (Nashik Crime News)

किरण गवळी हे महात्मा जोतीराव फुले विद्यालयात शिक्षक म्हणून कार्यरत होते. घटनेच्या दिवशी म्हणजेच 6 मार्च रोजी दहावीच्या विद्यार्थ्यांचा इंग्रजीचा पेपर होता. यावेळी गवळी हे सहकाऱ्यांसह पेपरची तयारी करत होते. यावेळी त्यांना अचानक चक्कर आली आणि ते बेशुद्ध होऊन खाली कोसळले. यानंतर त्यांना तातडीने शहरातील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र त्या ठिकाणी डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. याप्रकरणी सिन्नर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक रामदास धुमाळ या घटनेचा अधिक तपास करत आहेत. या दुर्दैवी घटनेमुळे शिक्षण क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Web Title : Nashik Crime News | teacher came for supervising dies due to heart attack in nashik during ssc exam

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

MLA Sada Sarvankar | शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकरांना ‘त्या’ प्रकरणात पोलिसांकडून ‘क्लिन चीट’

Urfi Javed | उर्फी जावेदने ‘या’ कारणामुळे खतरो के खिलाडी कार्यक्रमास दिला नकार