Nashik Crime News | अज्ञात महिलेने घरात घुसून आईला बेशुद्ध करून 3 महिन्यांच्या मुलीची केली हत्या, नाशिकमधील घटना

नाशिक : पोलीसनामा ऑनलाईन – नाशिक (Nashik Crime News) जिल्ह्यात एक मन हेलावून टाकणारी घटना उघडकीस आली आहे. यामध्ये एका अज्ञात निर्दयी महिलेने एका तीन महिन्याच्या निष्पाप चिमुकलीची गळा चिरून हत्या (Murder) केली आहे. नाशिक शहरातील गंगापूर रोडवर असलेल्या ध्रुव नगर परिसरामध्ये हि घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी एका अज्ञात महिलेविरोधात (Nashik Crime News) हत्येचा गुन्हा (FIR) दाखल केला आहे. धृवांशी भूषण रोकडे Dhruvanshi Bhushan Rokade (वय 3 महिने) असे हत्या करण्यात आलेल्या चिमुकलीचे नाव आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण?
नाशिक जिल्ह्यातील गंगापूर सातपूर लिंक रोड वर असलेल्या धृव नगर परिसरात भूषण रोकडे (Bhushan Rokde) हे आपली पत्नी, आई आणि त्यांची ३ महिन्यांची मुलगी हिच्यासोबत राहतात. भूषण हे सातपूर येथील एका कंपनीत सुपरवायझर म्हणून कार्यरत आहेत. घटनेच्या दिवशी म्हणजेच सोमवारी ते नेहमीप्रमाणे कामाला गेले होते. त्यावेळी घरात त्यांच्या आई आणि पत्नी दोघीच होत्या. यादरम्यान दुपारच्या सुमारास त्यांची आई दूध आणण्यासाठी घराबाहेर पडली. त्यावेळी भूषण यांची पत्नी आणि चिमुकली धृवांशी घरात होत्या. या संधीचा फायदा घेत एक पंजाबी ड्रेस घातलेली अज्ञात महिला अचानक त्यांच्या घरात शिरली. (Nashik Crime News)

या महिलेने रुमालाला लावलेल्या गुंगीचे औषधाने धृवांशीला आणि तिच्या आईला बेशुद्ध केले.
यानंतर त्या आरोपी महिलेने क्रूरतेने धृवांशीची गळा चिरून हत्या केली.
यानंतर काही वेळाने भूषण यांची आई दूध घेऊन घरी आल्या.
तेव्हा त्यांची सून बेशुद्ध अवस्थेत आढळून आली तर तीन महिन्यांची नात रक्ताने माखलेल्या अवस्थेमध्ये
आढळून आली. यानंतर त्यांनी मोठमोठ्याने आरडाओरडा करत याची माहिती शेजाऱ्यांना दिली.
यानंतर शेजाऱ्यांनी तातडीने धृवांशी आणि तिच्या आईला रुग्णालयात दाखल केले मात्र त्याअगोदरच धृवांशीचा
दुर्देवी मृत्यू (Death) झाला होता. या घटनेची माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले.
हि हत्या नेमकी कोणत्या कारणामुळे करण्यात आली याचा तपास सध्या पोलीस करत आहेत.

Web Title :-  Nashik Crime News | tragic incident in nashik unknown women attack on women and killed three month old girl child

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Home Remedy For Back Pain Treatment | पाठदुखीवर रामबाण उपाय ! आरामासाठी ‘हे’ घरगुती उपाय वापरा

Home Remedy For Asthma | दम्यावर आराम देऊ शकतात ‘हे’ 5 घरगुती उपाय; जाणून घ्या

Symptoms Of Stress | तणाव घेतल्याने वाढतो ‘या’ 2 गंभीर आजारांचा धोका; जाणून घ्या